शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

डोलघर ग्रामस्थांना हवी स्वतंत्र ग्रामपंचायत; पनवेल प्रांत कार्यालयावर ग्रामस्थांनी दिले धरणे 

By वैभव गायकर | Updated: March 24, 2023 16:23 IST

लोकमत न्युज नेटवर्क पनवेल : पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळाकडून डोलघर गाव आणि भोकरावाडी आदिवासी वाडीला दुय्यम वागणूक मिळत ...

लोकमत न्युज नेटवर्कपनवेल: पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळाकडून डोलघर गाव आणि भोकरावाडी आदिवासी वाडीला दुय्यम वागणूक मिळत असल्याने डोलघर  गाव आणि वाढीचा विकास खुंटला असल्याचा आरोप करीत ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळा मधून मौजे डोलघर व भोकरवाडी आदिवासी विभक्त करून स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी येथील ग्रामस्थानी दि.24 रोजी मोर्चा काढत पनवेल प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ विशेषतः महिलांची या मोर्चात सहभाग होता. 

 डोलघर गावासाठी सर्वे नंबर 82/1 मध्ये गावठाण विस्तार करण्यात यावा व तलाठी सजा डोलघर  आणि कर्नाळा हद्दीतील गहाळ केलेले सर्वे नं. 217 चा सातबारा, फेरफार व इतर संबंधित दस्तावेज देण्यात यावे या मागण्यांसाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ राजू पाटील जनार्दन कोळी, अविनाश गायकर, गणेश कोळी, धनाजी गायकर, विश्वनाथ केशव पाटील, बाळाराम खोत, भरत गायकर, अशोक गायकर, हिराबाई पाटील हिरुबाई खोत, निकिता पाटील, नलिनी गायकर यांच्यासह शेकडो कोळी बांधवांनी पनवेल प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रांत कार्यालयाचे प्रतिनिधी तहसीलदार एस  जाधव, पनवेल तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संभाजी शेलार, सहाय्यक गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक आणि मोर्चेकरांच्या शिष्टमंडळासोबत मागण्यांवर चर्चा करून पुढील दहा दिवसात याबाबत लेखी कळविण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार शेलार यांनी सांगितले.

दरम्यान महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ इंगळे, जेष्ठ विधीज्ञ ॲड. विनायक शेडगे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील, स्मिता रसाळ, शैलेश कोंडसकर, सचिन पाटील, उरण सामाजिक संस्थेचे प्रा. राजेंद्र मढवी, आदींनी मोर्चेकऱ्यांना पाठिंबा दिला.

पंधरा दिवसांचे अल्टिमेटम पुढील पंधरा दिवसात आमच्या मागण्यांवर ठोस कारवाई न झाल्यास डोलघरच्या महिला पनवेल पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांच्या कार्यालयाला घेराव घालतील आणि पुरुष पनवेल प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील असा इशारा मोर्चेकऱ्यांच्या वतीने संतोष ठाकुर यांनी दिला.

टॅग्स :panvelपनवेल