शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, परिचारिका गैरहजर , खालापुरात आरोग्य केंद्र सुरक्षारक्षकाच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 02:00 IST

सध्या सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा धसका खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकांनी घेतला असून दोघेही गैरहजर राहिल्याने शनिवारी रात्री दिवस भरलेल्या गर्भवती महिलेला उपचाराअभावी राहावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे.

- अंकुश मोरेवावोशी : सध्या सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा धसका खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकांनी घेतला असून दोघेही गैरहजर राहिल्याने शनिवारी रात्री दिवस भरलेल्या गर्भवती महिलेला उपचाराअभावी राहावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे.खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नावनोंदणी असलेल्या गरोदर महिलेला शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्रास जाणवू लागल्याने तिचा पती आणि नातेवाईक खालापूर आरोग्य केंद्रात घेऊन गेले, परंतु रुग्णालयात पूर्णपणे अंधार आणि शुकशुकाट होता. रात्रपाळीसाठी असलेल्या सुरक्षारक्षकाला उठविले असता डॉक्टर बाहेरगावी गेल्याचे उत्तर मिळाले. तसेच रात्रपाळीसाठी असलेली परिचारिका गैरहजर असल्याचे सांगितले. महिलेला जास्त त्रास होत असल्याने ड्युटीवर नसलेल्या परिचारिकेला विनंती करून तपासण्याची विनंती नातेवाइकांनी केली. परिचारिकेने तपासणी करून खोपोली येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी पी.बी. रोकडे यांना फोन करून माहिती दिल्यानंतर त्यांनादेखील खालापूरचे डॉक्टर तसेच परिचारिका हजर नसल्याबद्दल आश्चर्य वाटले. काही तरी व्यवस्था करतो, असे सांगितले. अखेर नातेवाइकांवर गर्भवतीला घरी नेण्याची पाळी आली.रात्रपाळीसाठी तैनात परिचारिका का गैरहजर राहिली याबाबत चौकशी करून त्यावर कारवाई करू. मी संध्याकाळी सात वाजेपर्यंत खालापुरात कोरोनाबाबत बैठकीसाठी तहसीलदारांसोबत होतो. - डॉ. अनिलकुमार शहा,वैद्यकीय अधिकारी, खालापूर प्रा.आ. केंद्रमाझ्या पत्नीला त्रास होऊ लागल्याने आम्ही आरोग्य केंद्रात गेलो. डॉक्टर आणि नर्स नसल्याने खोपोलीला जा असे उत्तर मिळाले. आरोग्य केंद्राच्या इमारतीवर लाखो रुपये खर्च करून उपचार मिळत नसतील तर अशा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे.- किशोर गायकवाड, खालापूर 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRaigadरायगड