शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दासगाव आरोग्य केंद्रातील डॉक्टर बेकायदा रजेवर

By admin | Updated: September 1, 2016 03:15 IST

मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी दोन अपघात झाले. या अपघातातील जखमींना दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरच्या बेकायदा रजेचे गौडबंगाल उघड झाले

सिकंदर अनवारे, दासगावमुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी दोन अपघात झाले. या अपघातातील जखमींना दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरच्या बेकायदा रजेचे गौडबंगाल उघड झाले आहे. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विशाल पाटील हे वरिष्ठांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच रजेवर गेले तर गोरेगावचे डॉक्टर त्यांच्या जागी काम करताना आढळल्याने आरोग्य सेवेतील हा सावळागोंधळ उघड झाला आहे.बुधवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर या दोन अपघातांमध्ये गाड्यांचे चालक जखमी झाले. किरकोळ दुखापती झालेल्या त्या चालकांना प्रथमोपचारासाठी दासगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील हे रजेवर गेले असल्याचे सांगत येथील नर्स आणि शिपायांनी उपचार सुरू केले. कोणताही जबाबदार वैद्यकीय अधिकारी समोर नसताना सुरू असलेल्या या प्रथमोपचाराबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. पाटील हे रजेवर गेले आहेत. याची खातरजमा करण्यासाठी महाड तालुका आरोग्य अधिकारी एजाज बिराजदार यांना संपर्क केला असता दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पाटील यांनी कोणताच अर्ज कार्यालयात दिला नसून त्यांच्या रजेबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. यामुळे डॉ. पाटील बेकायदा रजेवर गेल्याचे उघड झाले आहे. डॉ. पाटील रजेवर असताना गोरेगाव येथील डॉ. अश्विता शेट्टी या दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करीत असल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ कार्यालय आणि अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना नसताना एक डॉक्टर रजेवर जातो. त्या जागी दुसरा डॉक्टर आपली ड्युटी बजावतो, असे हे गौडबंगाल या प्रकरणामुळे उघड झाले आहे.