शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे अधिकार कमी करू नका

By admin | Updated: January 4, 2017 04:59 IST

समाजातील वाईट आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याकरिता पोलिसांचे अधिकार कमी करून चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा सुयोग्य अर्थ लावला

अलिबाग : समाजातील वाईट आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याकरिता पोलिसांचे अधिकार कमी करून चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा सुयोग्य अर्थ लावला गेला नसल्याने, पोलिसांचे अधिकार कमी केले आहेत असा एक समज निर्माण झाला होता. अटक करताना अटक करण्यामागची सुयोग्य कारणे आणि त्याकरिता आवश्यक पुरावे दोषारोपपत्रात पोलिसांनी नमूद केले पाहिजेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ वकील तथा रायगड जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.प्रसाद पाटील यांनी सोमवारी येथे केले आहे.२ जानेवारी या महाराष्ट्र पोलीस दलाच्या रेझिंग डेनिमित्त अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी अलिबाग पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आयोजित एका विशेष परिसंवाद कार्यक्रमात अ‍ॅड.पाटील बोलत होते. देशातील प्रत्येक राज्याच्या पोलीस दलास स्वत:ची ओळख असावी या हेतूने प्रत्येक राज्य पोलिसांना स्वतंत्र झेंडा २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रदान केला. आणि म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस दलात रेझिंग डे म्हणून साजरा करण्यात येत असल्याची माहिती कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. रेझिंग डेनिमित्त आयोजित जनजागृती रॅलीचे उद्घाटन शहरातील आंग्रे चौकातील शिवाजी पुतळ््याजवळ रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.प्रसाद पाटील,क्राइम पेट्रोल दूरदर्शन मालिकेतील महिला पोलीस निरीक्षक भूमिका साकारणाऱ्या हेमलता बाणे आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रायगड पोलीसच्या बॅन्ड पथकाच्या शानदार तालावर निघालेल्या या रॅलीमध्ये शहरातील मान्यवर नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक, अधिकारी, महिला व पुरुष पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील आणि क्राइम पेट्रोल दूरदर्शन मालिकेतील महिला पोलीस निरीक्षक भूमिका साकारणाऱ्या हेमलता बाणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. परिसंवादात अलिबागच्या उपनगराध्यक्षा अ‍ॅड.मानसी म्हात्रे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ल.नी.नातू यांनीही पोलीस यंत्रणेच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.डी.पाटील यांनी के ले. (विशेष प्रतिनिधी)