शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

डिएनए चाचणीमुळे आकरा मृतांची ओळख पटली

By निखिल म्हात्रे | Updated: November 10, 2023 19:48 IST

अलिबाग - महाड एम आय डी सी मधील ब्लु जेट कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ११ कामगारांची डिएनए चाचणीच्या ...

अलिबाग- महाड एम आय डी सी मधील ब्लु जेट कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ११ कामगारांची डिएनए चाचणीच्या तपासणीनंतर ओळख पटली असून या ११ कामगारांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लु जेट कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत ११ कामगारांचा मृत्यू व ७ कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनेत मृत पावलेल्या सर्व ११ कामगारांची डिएनए चाचणी करण्यात आली होती. या चाचणीच्या तपासणी केल्यानंतर  ओळख पटल्यानंतर आज (शुक्रवारी) त्यांचे आकरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यापैकी महाड तालुक्यातील चोचिंदे येथील आदित्य मोरे, खरवली येथील संजय पवार आणि तळीये येथील अक्षय सुतार यांचे पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यापैकी चोचिंदे येथील आदित्य मोरे यांचे वडील यांना कंपनी प्रशासनाकडून दिलेला ३० लाखाचा धनादेश तहसिलदार महेश शितोळे, डिवायएसपी शंकर काळे, आ. भरतशेठ गोगावले, महाड शहर पोलिस ठाणे पो.नि. खोपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे, युवा सेनेचे महाड तालुका प्रमुख रोहीदास( पप्या)अंबावले, इम्रान पठाण आदी उपस्थित होते.मयताची नाव -१) अभिमन्यू भीमरोग उराव, २) जीवन कुमार चौबे ठाकूर, ३) विकास बहुत महंतो, ४) संजय शिवाजी पवार५) अक्षय बाळाराम सुतार, ६) आदित्य मोरे, ७) शशीकांत दत्तात्रय भूसाणे,  ८) सोमनाथ शिवाजी वायदंडे, ९) विशाल रविंद्र कोळी १०) अस्लम महबूब शेख, ११)सतीश बापू साळुंके.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग