शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांनी केली रायगड किल्ल्याची चढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:04 IST

इच्छाशक्तीपुढे निसर्गालाच आव्हान देण्याचे काम शनिवारी मुंंबईतील ५५ दिव्यांगांनी केले.

- जयंत धुळपअलिबाग : इच्छाशक्तीपुढे निसर्गालाच आव्हान देण्याचे काम शनिवारी मुंंबईतील ५५ दिव्यांगांनी केले. बेलाम रायगड किल्ला पायी चढून त्याची भ्रमंती करण्याचे साहस जुहूच्या रोटरी क्लब आणि फिनिक्स फाउंडेशनच्या दिव्यांग मित्रांनी जागतिक अपंग दिनाच्या पूर्वसंध्येला केले.मुंबईहून शनिवारी सकाळी दिव्यांगांचा चमू रायगडकडे रवाना झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे रायगडच्या पायथ्याशी पोहोचण्यास त्यांना संध्याकाळ झाली. सायंकाळी ४ वाजता रायगड किल्ला नाणेदरवाजापासून त्यांनी किल्ला चढायला सुरूवात केली. कोणी कुबड्या घेऊन तर कुणी दोन्ही हातात काठ्या घेऊन असे पन्नासएक दिव्यांग रायगड चढत होते. सुटीचा वार असल्याने पायवाटेवर गर्दीही होती. सर्वसामान्य माणसाला गड चढताना धाप लागते, मात्र या दिव्यांगांची हिंमत पाहून अनेक जण अवाक् झाले. रविवार संपूर्ण दिवस दिव्यांगांनी इतिहास अभ्यासक संजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडभ्रमंती केली.जय शिवाजी, जय भवानीचा जयघोष करीत चढाई सुरू केल्याने, गड चढताना कोणताही त्रास झाला नसल्याची प्रतिक्रिया गुडघ्यापासून सळई बसवलेल्या विनोद रावत यांनी दिली.गेली अठरा वर्षे फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील साहसी भ्रमंतीत दिव्यांगांना सहभागी करण्याचे धाडस केले जात आहे. कळसूबाईचे शिखर, अनेक सुळके, लोहगडासारखे अवघड किल्ले यापूर्वी अशा दिव्यांगांनी सर केले आहेत. या साहसी उपक्र माचे महाडचे आमदार भरत गोगावले यांच्याकडूनही कौतुक करण्यात आले.