शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांची जिल्हाप्रशासनावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:46 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

अलिबाग : दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.

संसदेमध्ये २०१६ मध्ये दिव्यांग कायदा संमत करण्यात आला आहे. त्या वेळी पुढील दोन वर्षांत या कायद्याची सक्त अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र, राज्य सरकारने या कायद्याची अंमलबजावणी न करता, केवळ वेगवेगळ्या परिपत्रकाच्या माध्यमातून वेळकाढूपणा करण्याचे काम केल्याचा आरोप संघटनेने केला. दिव्यांग कायद्याची अंमलबाजवणी करावी, तसेच दिव्यांगांना भेडसावणाºया विविध समस्यांसदर्भात आमदार बच्चू कडू यांनी विधानभवनात आवाज उठविला.

तसेच राज्यभर आंदोलनही उभारले; परंतु आश्वासन देण्याशिवाय सरकारने काहीच केले नाही, असे म्हटले आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने आक्र मक भूमिका घेतली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर तळ ठोकून विविध घोषणा याप्रसंगी दिल्या. या आंदोलनात प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे जिल्हा संघटक शिवाजी कांबळे, कार्याध्यक्ष दीपक घाग यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दिव्यांगांच्या प्रमुख मागण्यादिव्यांग हक्क कायदा २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करावी, बेघर दिव्यांगांसाठी समूह घरकुल योजना राबवावी, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी सवलतीच्या किमतीत अथवा भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून द्यावी, दिव्यांगांसाठी रोजगार मेळावे घेण्यात यावेत, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी सुलभ रीतीने अर्थसाहाय्य उपलब्ध व्हावे, अशा प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.