शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रेवदंड्यातील रस्त्यावर डबकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2015 00:45 IST

अलिबाग हमरस्त्यावरील रेवदंडा बाजारपेठेत रस्ता अरुंद असल्याने दुतर्फा नाल्याची, गटारांची व्यवस्था नसल्याने बाजारपेठेत डबकी तयार झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.

रेवदंडा : अलिबाग हमरस्त्यावरील रेवदंडा बाजारपेठेत रस्ता अरुंद असल्याने दुतर्फा नाल्याची, गटारांची व्यवस्था नसल्याने बाजारपेठेत डबकी तयार झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. रेवदंडा गाव आता शहरीकरणाच्या वळणावर झुकले आहे. अनेक कौलारू घरांची जागा तीन चार मजली इमारतींनी घेतली आहे. उभ्या राहिलेल्या इमारतींना रस्त्यावर गटारांची सोय उपलब्ध नसल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षीच्या ग्रामसभेत इमारतींची संख्या वाढत असल्याने गटार योजना टप्प्याटप्प्याने राबवा असा मुद्दा चर्चेने गाजला मात्र सभा संपली आणि विषयही संपला अशी स्थिती झाली. सध्या पावसाने मुसंडी मारल्याने रस्त्यावर डबकी वाढत आहे. यामुळे पादचाऱ्यांना रंगपंचमीचा अनुभव येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याच भागातील चौल गावच्या हद्दीत नाले तयार केले असून त्यांची स्वच्छता झालेली नाही. शिवाय त्या नाल्यांना संरक्षण कठडा किंवा दगडांची निशाणी नसल्याने या नाल्यात अपघात होण्याचे प्रकार घडले आहेत, मात्र यात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. नागाव भागात तर रस्त्यावर ओहोळ वाहतात अशी स्थिती पहावयास मिळते मात्र अनेक वर्षे उलटूनही या रस्त्याकडे व दुतर्फा नाले करण्यासाठी कोणी वाली मिळाला नाही, ही या भागाची शोकांतिका आहे. रेवदंडा शहरीकरणाकडे झुकत आहे. मात्र गटारे नसल्याने पर्जन्यवृष्टीत डासांचा हमखास प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गावातील अंतर्गत रस्ते उंच झाले, पर्यायाने मुख्य रस्त्यावरील पाण्याचे नैसर्गिक मार्ग बदलले ही बाब पाहता बाजारपेठेतील रुंदीकरणाचे अडलेले घोडे दूर झाल्यास रुंदीकरणात गटारे होतील व पाण्याचा निचरा होईल अशी येथील व्यावसायिकांना अपेक्षा आहे. (वार्ताहर)