शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमधील जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती

By admin | Updated: July 10, 2015 22:00 IST

रायगड जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या येथील जिल्हा रुग्णालयाची झालेली दुरवस्था आणि त्यामुळे रुग्णांचे आणि वैद्यकीय अधिकारी

जयंत धुळप, अलिबागरायगड जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या येथील जिल्हा रुग्णालयाची झालेली दुरवस्था आणि त्यामुळे रुग्णांचे आणि वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी यांचे होणारे हाल या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अलिबागचे आमदार पंडित पाटील यांनी या रुग्णालयास भेट देवून साऱ्या दुरवस्थेची चक्क झाडाझडतीच घेतली.जिल्हा रुग्णालयाकरिता शासनाकडून मंजूर करुन आणलेल्या पाच लाख रुपयांतून होणे अपेक्षित असलेली कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याचे लक्षात आल्यावर पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बांधकाम विभाग सहकार्य करीत नसल्याने कंत्राटदार कामे वेळेत पूर्ण करु शकत नसल्याने रुग्णांसह सर्वांनाच मोठी गैरसोय सहन करावी लागत असल्याचेही या वेळी दिसून आले.-----------जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाहुबली नागावकर, अलिबाग सार्वजन्ािक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही.कांबळे, अभियंता आर.आर.विडेकर, कंत्राटदार अमित नारे, सवाई पाटील, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक राजेंद्र धिवरे, नेत्र रोगतज्ज्ञ डॉ.प्रीती प्रधान, मेट्रन जयश्री मोरे आदीं समवेत बैठक घेवून, रुग्णालयाच्या विविध विभागांची पाहणी करुन निष्पन्न झालेल्या कमतरता तत्काळ दूर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.--------बांधकाम विभाग महिनाभरात कामे पूर्ण करणारनेत्र रूग्ण विभाग आणि परिचारिका वसतिगृहाची झालेली दुरवस्था तत्काळ करण्याचे सांगून येत्या महिनाभरात ही सारी कामे पूर्ण केल्यावर आपण पुन्हा येवून ती कामे झाली किंवा नाही याची खातरजमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. च्१२ स्वच्छता कर्मचाऱ्यांवर वर्षाला दहा लाख रुपये खर्च करण्यात येतात परंतु स्वच्छता कंत्राटदारांचे हे कर्मचारी स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे करीत नसल्याने त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करुन घेण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्हा रुग्णालयात सांडपाण्याचे व्यवस्थापन योग्य नसल्याने अनेक समस्या निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यावर नाले व ड्रेनेजचे काम प्राथम्याने करण्याचे त्यांनी सूचित केले.च्रुग्णालयातील सद्यस्थितील सर्व अपूर्ण असलेली कामे या महिन्यात पूर्ण करुन देण्याचे आश्वासन यावेळी अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही.कांबळे यांनी दिले.