शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

तालुक्यात पोषण आहार वाटप ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:06 IST

खालापूर तालुक्यात उघडकीस आलेला आणि रायगड जिल्हा परिषदेपर्यंत धागेदोरे असलेला कोट्यवधींचा पोषक आहार

अमोल पाटील खालापूर : खालापूर तालुक्यात उघडकीस आलेला आणि रायगड जिल्हा परिषदेपर्यंत धागेदोरे असलेला कोट्यवधींचा पोषक आहार घोटाळा उघडकीस येऊन तब्बल दोन महिने उलटले आहे. तेव्हापासून आजतागायत तालुक्यातील पोषक आहाराचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील वाड्यावस्तीवर कुपोषणाची समस्या पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.खालापूर तालुक्यात चौक हद्दीतील तुपगाव येथील कारखान्यातून स्वयंसिद्धा महिला बचत गटामार्फत गरोदर व स्तनदा महिला व बालकांसाठी पोषक आहार पुरविण्यात येत होता. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कमी वजनाचा पोषक आहार सीलबंद केला जात असल्याची माहिती खालापूर पंचायत समिती सभापती श्रद्धा साखरे यांना मिळाल्यानंतर २४ जानेवारीला रात्री सभापती साखरे, उपसभापती विश्वनाथ पाटील, सहायक गटविकास अधिकारी पोळ, सुमित खेडेकर, एकात्मिक बालविकासचे चांदेकर यांनी खालापूर पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांच्या मदतीने तुपगाव येथील कारखान्यात पाहणी केली. त्यावेळी त्याठिकाणी पोषक आहाराची १४६८ पाकिटे जवळपास चाळीस टक्के कमी वजनाची भरलेली आढळली. पोलिसांनी ५७,१०० रुपयांचा माल जप्त केला होता. त्यानंतर एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी जयपाल राजाराम गहाणे (५६) यांच्यासह आठ जणांना याप्रकरणी अटक झाली होती, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचा कार्यभार सांभाळणारा महेंद्र गायकवाड हा फरारी आहे. पोषण आहार घोटाळ्यानंतर खालापूर तालुक्यातील(टीएचआर) घरपोच आहार योजना खंडित झाली असून बालके, गरोदर व स्तनदा माता यांची थाळी रिकामीच आहे. खालापूर तालुक्यात फेब्रुवारी २०१८ च्या आकडेवारीनुसार शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या ७४३६ असून त्यामध्ये ० ते ३ वर्षे वयाची ३७१८ बालके तर ३ ते ६ वर्षे वयाची देखील ३७१८ बालके असल्याची नोंद आहे. याशिवाय तालुक्यात गरोदर मातांची संख्या १५१५ असून स्तनदा मातांची संख्या १५१५ आहे. या सर्वांना गेल्या दोन महिन्यापासून पोषक आहाराचे वाटप झालेले नाही. याबाबत खालापुरातील एकात्मिक बालविकास कार्यालयात विचारणा केल्यानंतर पोषक आहार सुरू करण्यासाठी तीन वेळा जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग येथे पत्रव्यवहार केल्याची माहिती तेथील कर्मचारी बोरकर यांनी दिली. पोषक आहारात घोटाळा करणारे सध्या जामिनावर सुटले असले तरी आहार पुरवठा पूर्ववत झालेला नाही.