शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दगड पडल्याने दरडग्रस्त भयभीत

By admin | Updated: August 18, 2015 23:33 IST

महाड तालुक्यातील २००५ मधील दरडग्रस्त गाव असलेल्या दासगावमध्ये सोमवारी सायंकाळी एका बंद घरावर शेजारील डोंगरावरून मोठा दगड घरंगळत आला

दासगाव : महाड तालुक्यातील २००५ मधील दरडग्रस्त गाव असलेल्या दासगावमध्ये सोमवारी सायंकाळी एका बंद घरावर शेजारील डोंगरावरून मोठा दगड घरंगळत आला. यात घराचे नुकसान झाले नसले तरी २००५ मधील दरडीची भीती ग्रामस्थांमध्ये कायम असल्याने या घटनेने ग्रामस्थ पुन्हा एकदा भयभीत झाले आहेत. प्रशासनाने याची दखल घेत गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.महाडमधील दासगाव गावातील भोईवाडा परिसरात सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टेकडीवरून एका घरावर मोठा दगड घरंगळत आला. हा दगड घराच्या जोत्यावर अडकल्याने नुकसान झाले नाही. दासगावमध्ये ज्या ठिकाणी दरड कोसळली होती त्या स्थळापासून अवघ्या काही सेकंदाच्या अंतरावरच हे घर आहे. या ठिकाणी केवळ दगड आला असला तरी या स्थळाजवळ असलेल्या इतर दगडी तसेच मातीचा काही भाग पाऊस पडताच खाली येण्याची शक्यता आहे. हे वृत्त ग्रामस्थांनी तत्काळ महाड महसूल विभागाला दिले असता महाडचे तहसीलदार संदीप कदम यांनी तलाठी संदेश पानसरे यांना तत्काळ पाचारण केले.२००५ मध्ये महाड तालुक्यातील तीन गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळून जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली होती. यावेळी ३५ घरे मातीखाली गाडली गेल्याने ४८ निष्पाप ग्रामस्थांना प्राण गमवावा लागला होता. गेली सात वर्षे प्रशासन या ठिकाणी लक्ष देऊन असून पावसाळ्यात सतर्क राहण्याबरोबरच स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या जातात. ज्या ठिकाणी हा दगड आला आहे त्या ठिकाणी जवळपास १५०० ग्रामस्थांची वस्ती आहे. गतवर्षी भोईवाडा परिसरात टेकडीचा काही भाग घसरला होता. यावर्षी पावसाळा कमी असला तरी दरडीची भीती लोकांच्या मनात कायम आहे. (वार्ताहर)