शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागात पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:14 IST

एमजीपीचे लाखोंचे पाणी बिल थकले : ग्रामस्थ आक्रमक; आश्वासनानंतर तात्पुरता पूर्ववत

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : माथेरान येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी योजनेचे लाखोंचे पाणी बिल नेरळ- माणगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आदिवासी वाड्यांकडून थकल्याने या गावातील पाणीपुरवठा प्राधिकराणाकडून खंडित करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही आश्वासनांनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याने  सुरुवातीला ग्रामस्थांनी प्राधिकरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने नेरळ ग्रामपंचायत सदस्यांनी कोरोनाचे संकट आणि उन्हाळा तोंडा समोर असल्याने प्राधिकरणाने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपले पाणी बिल काही कालावधीत टप्प्यात भरले जातील, या अश्वासनावर हा पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, माथेरान पाणीपुरवठा योजनेतून पुरविण्यात येणाऱ्या नेरळ- माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील जुमापट्टी येथील तीन हजार लोकसंख्या असलेल्या सहा आदिवासी वाड्यांचा पाणीपुरवठा बिल संबंधित ग्रामपंचायतीकडून न भरल्याने प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. याबाबत प्राधिकरणाचे लाखोंचे बिल अडकल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.यावर ग्रामस्थांनी आक्रमक होत प्राधिकरणाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत माथेरान पाणीपुरवठा योजनेसाठी आम्ही आमच्या जागा, जमिनी दिल्या असल्याचे सांगत त्या बदल्यात गावकऱ्यांना पाणी देण्याचे ठरले असतानादेखील प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला, तर यापुढे गावचा पाणीपुरवठा खंडित झाल्यास प्राधिकरणाची पाइपलाइनही आमच्या जागेतून काढण्यात येईल, असा इशारादेखील ग्रामस्थांनी दिला.माथेरानकरांप्रमाणे दिली बिलेप्राधिकरणाच्या माध्यमातून जे पाणी बिल देण्यात आले आहे ते पाणी बिल माथेरानकरांना देण्यात येत असलेल्या प्रकारे लावण्यात आल्याने हे बिल जास्त आहे. आम्हाला पाणी हे फिल्टर न देता सरळ उलचलेले देण्यात येत आल्याने हे पाणी बिल कमी करून देण्याची मागणीदेखील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यावेळी नेरळ ग्रामपंचयत सदस्य मंगेश म्हसकर यांनी संबंधित प्राधिकार अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपले पाणी बिल काही टप्प्यांत भरण्यात येईल, असे सांगितले.