शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कचरा रस्त्यात टाकणे पडणार महागात; पोलीसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली जाणार

By निखिल म्हात्रे | Updated: March 3, 2024 14:34 IST

रायगड जिल्ह्यात वाढत्या कचऱ्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी अस्ताव्यस्त कचऱ्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अलिबाग - रायगड जिल्ह्यात वाढत्या कचऱ्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी अस्ताव्यस्त कचऱ्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता रस्त्यात कचरा टाकणे महागात पडणार आहे. त्या व्यक्तीविरोधात पोलीसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.याची अंमलबजावणी लवकरच सुरु केली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यात कचरा टाकताना सावधान बाळगा.

रायगड जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती, 54 प्राथमिक आरोग्य केंद्र, 288 हून अधिक आरोग्य उपकेंद्र आहेत. 2011 च्या जनगणनेनूसार जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार इतकी असून एक हजार 900हून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात वाढते पर्यटन व औद्योगिकीकरणामुळे नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. गावांमध्ये लोकवस्ती वाढत असल्याने तेथील कचरा व अन्य सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीला महागात पडत आहे. जिल्ह्यात कचरा भूमीचा अभाव असल्याने अनेक जण मिळेल त्याठिकाणी कचरा टाकत असतात. काही जण रस्त्याच्या कडेला, तर काही जण शेतांमध्ये कचरा टाकतात. तर काही जण घराच्या परिसराजवळ मोकळ्या जागेत कचरा टाकत असतात.जिल्ह्यामध्ये वाढत्या पर्यटनाबरोबरच औद्योगिकीकरणामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे तारेवरची कसरत होऊ लागली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी मिशन विभागामार्फत स्वच्छता मोहिम ठिकठिकाणी राबविली जात आहे. कचरा मुक्तीसाठी त्यांच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. परंतु नव्याचे नऊ दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम गावांतील मानवी आरोग्याबरोबरच पर्यावरण होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्लास्टीक व अन्य कचरा जाळल्याने धुराचा धोका निर्माण होऊन प्रदुषण होण्याची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजाराला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे आता कचरा टाकणाऱ्यांविरोधात जिल्हा परिषदेने कडक पाऊल टाकण्याची मोहिम हाती घेतली आहे.मोठ्या शहरांध्ये ज्या पध्दतीने कचरा रस्त्यात टाकल्यावर पोलीसांमार्फत कारवाई केली जाते. त्या पध्दतीने जिल्ह्यात पोलीसांच्या मदतीने कारवाई होणार आहे. त्याची हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार सुरुवातीला पोलीस व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांच्या बैठक घेतली जाणार आहे. गावागावात ठिकठिकाणी फलक लावून कचरा न टाकण्याचे आवाहन केले जाणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती यामाध्यमातून केली जाणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात मुंबई पोलीस ॲक्टनुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आता कचरा टाकताना जरा सावधानता बाळगा असे बोलले जात आहे.जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी प्रयत्न केला जात आहे. वेगवेगळे उपक्रम राबवून गावांमध्ये जनजागृती केली जात आहे. तरीदेखील काहीठिकाणी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी मिशन मोडवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी व पोलीस अधीक्षक यांच्या सहीचे पत्र दिले जाणार आहे. पोलीसांच्या मदतीने कचरा टाकणाऱ्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.

- शुभांगी नाखले, उपमुख्य कार्यकारी अधिकारीस्वच्छता व पाणी मिशन, रायगड जिल्हा परिषद.