शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पालिकेत कोरोना लसीकरणावर चर्चा, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची एकत्र बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 00:49 IST

Panvel News : कोविडनंतर तब्बल ९ महिन्यांनी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व अधिकारी यांची एकत्रित बैठक गुरुवारी ज्येष्ठ नागरिक सभागृहात पार पडली.

पनवेल - कोविडनंतर तब्बल ९ महिन्यांनी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व अधिकारी यांची एकत्रित बैठक गुरुवारी ज्येष्ठ नागरिक सभागृहात पार पडली. स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या बैठकीत कोरोना लसीकरण व कोरोना उपचारासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सर्वप्रथम कोरोनाचा आढावा घेत पालिकेकडे उपलब्ध असलेली संसाधनांची माहिती लोकप्रतिनिधींना दिली. लसीबाबत शासनाचे दिशानिर्देश अद्याप प्राप्त झाले नसल्याने लसीकरण कशा प्रकारे होणार आहे, याबद्दल आत्ताच सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी पालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले. यापूर्वी कोविडबाबत निर्णय घेताना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना डावलले असल्याचे त्यांनी सांगितले. पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांच्या घरोघरी जाऊन पालिकेकडून फवारणी कारण्यात आली. यात किती निधी खर्च झाला? खरोखर या घरांमध्ये फवारणी झाली का? याबाबत गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित करीत पालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले.शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी कोविडबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी पालिकेला स्वतंत्र्य लॅब उभारणीची मागणी केली. राज्यात कोविडवर सर्वांत कमी खर्च करणारी पनवेल महानगरपालिका आहे. राज्य शासनाने वेळोवेळी पालिकेला निधी उपलब्ध करून दिल्याने हे शक्य झाल्याने महाविकास आघाडी सरकार पनवेलकरांच्या पाठीशी असल्याचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. या बैठकीला उपमहापौर जगदीश गायकवाड आदीं उपस्थित होते.२७ कोटींचा खर्च कोविडसाठी पालिकेला २७ कोटींचा खर्च आला. यापैकी १० कोटी यापूर्वीच पालिकेला राज्य शासनामुळे मिळाले आहेत. काही दिवसांत आणखी १० कोटी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या पुढाकाराने मिळणार असल्याचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारकडे आम्ही केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याचे म्हात्रे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpanvelपनवेल