शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पाटील-तटकरेंमुळे पक्षात असंतोष

By admin | Updated: January 26, 2017 03:18 IST

रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा युती केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अलिबाग तालुक्यात उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे शेकापसोबत फरफटत जाण्यापेक्षा वेगळा पर्याय निवडला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते विजय कवळे यांनी सांगितले.हॉटेल रविकिरण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बुधवारी बोलत होते. काँग्रेसचे बॅ.ए.आर.अंतुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. दत्ता खानविलकर यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी होती. अंतुले यांनी मुख्यमंत्री असताना केवळ १८ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या विकासासह रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेतले. बॅ.अंतुले यांच्यामुळेच अलिबाग तालुक्यात आरसीएफचा प्रकल्प येऊ शकला, त्याचप्रमाणे रेवदंडा, आंबेत येथील पूल त्यांच्याचमुळे निर्माण झाले. अजून काही कालावधीसाठी ते मुख्यमंत्रीपदी विराजमान असते तर, अलिबाग-मुंबईला जोडणारा रेवस-करंजा पूलही झाला असता. अ‍ॅड. दत्ता खानविलकर यांनीही राज्यमंत्री असताना बरेच महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले, तर अलिबागचे नगराध्यक्ष असताना त्यांनी श्रीबाग ही वसाहत वसवली. दोन्ही नेत्यांनी समाजाच्या विकासासाठी काम केले, परंतु आताचे राजकारणी हे स्वत:च्या विकासासाठी झटत आहेत. यासाठी ते युत्या-आघाड्या करीत आहेत, असे सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाना साधला. तटकरे आणि पाटील यांची राजकीय कार्यपध्दत कवळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रस्थानी होती. नेत्यांच्या अशा वागणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भरोसा राहिलेला नाही, असेही कवळे यांनी स्पष्ट केले.शेकाप-राष्ट्रवादीला पराभव समोर दिसत असल्यानेच शेकापचे जयंत पाटील हे काँग्रेसला युतीमध्ये सामील होण्याचे आवाहन करीत आहेत. त्यापार्श्वभूमीवर अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर आणि पेणचे काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी त्यांच्या-त्यांच्या तालुक्यात शिवसेनेसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचेही कवळे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेसोबत जाण्याचे पक्के केले.