शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे गैरसोय, उद्याेग व्यवसायालाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 04:59 IST

माथेरानमध्ये वर्षभर लाखो पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, मूलभूत सोयी-सुविधांअभावी पर्यटकांची गैरसोय होत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये सध्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

माथेरान : माथेरानमध्ये वर्षभर लाखो पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, मूलभूत सोयी-सुविधांअभावी पर्यटकांची गैरसोय होत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये सध्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना पायी चालणे जिकिरीचे झाले आहे.मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अंतर्गत वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून शहरातील विकासकामे ठप्प आहेत, त्यामुळे येथील पर्यटन आणि त्यावर आधारित उद्योग व्यवसायांवरही परिणाम होत आहे. मुख्याधिकारी सागर घोलप यांनी आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला कामे दिल्याने शहरात विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांना गटाराचे स्वरूप आले आहे.दरवर्षी नगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची धूप होऊ नये, यासाठी एक हजाराहून अधिक लहान-मोठे दगडमातीचे बंधारे बांधण्यात येतात. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर न येता गटारातून वाहते; परंतु या वेळेस ठेकेदाराने घाईघाईत सखल भागात बंधारे बांधले आहेत. तसेच रस्त्यालगत नालेसफाईही झालेली नाही, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. रस्त्याची केलेली कामेही निकृष्ट दर्जाची आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे पाइप मोºयांच्या जागी बसविण्यात आले आहेत. मात्र, ते निसटल्याने रस्ता खचून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी घोडेस्वारीला पर्यटकांकडून पसंती दर्शवली जाते. मात्र, रस्ता खचल्याने घोड्यांनाही दुखापत होऊ शकते, त्यामुळे शहरातील रस्त्याच्या देखभालदुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.रस्त्यांच्या कामाची निविदा एप्रिल-मे महिन्यात पूर्ण करून कामे पूर्ण करणे नगरपालिका प्रशासनाचे काम आहे. गोणीद्वारे केलेले बंधारे फारकाळ तग धरू शकत नाहीत. ठेकेदाराने याबाबत गांभीर्याने घेऊन सुनियोजित पद्धतीने कामे करणे अपेक्षित आहे. घाईगडबडीत कामे पूर्ण करण्यासाठी धडपड करू नये. जेणेकरून रस्त्यांची धूप होणार नाही. रस्ते अधिक काळ कशाप्रकारे टिकतील यासाठी प्रयत्न करावेत.- शिवाजी शिंदे, विरोधी पक्ष,नगरसेवक माथेरान नगरपालिका

टॅग्स :Matheranमाथेरान