शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दिशादर्शक फलक गवतामुळे दिसेनासे

By admin | Updated: October 8, 2015 23:29 IST

पावसामध्ये उगवलेल्या गवतामुळे तसेच झाडांच्या वाढीमुळे टोळ, आंबेत, म्हाप्रल, दापोली मार्गावरील दिशादर्शक व मार्गदर्शक फलक झाकले गेल्याने रात्रीच्यावेळी या मार्गावरुन जाणाऱ्या

दासगाव : पावसामध्ये उगवलेल्या गवतामुळे तसेच झाडांच्या वाढीमुळे टोळ, आंबेत, म्हाप्रल, दापोली मार्गावरील दिशादर्शक व मार्गदर्शक फलक झाकले गेल्याने रात्रीच्यावेळी या मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांना धोकादायक वळणांचा अंदाज येत नसून या मार्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देवून हे गवत कापावे, अशी मागणी प्रवासी आणि वाहन चालकांकडून होत आहे.टोळ, आंबेत म्हाप्रल मार्ग हा दापोली, खेड, रत्नागिरी विभागाकडे जाण्यासाठीचा महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग महाड तालुक्यातील टोळ गावाच्या फाट्याजवळ येऊन राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठी धोकादायक वळणे आहेत. पावसामुळे रस्त्यालगत असणाऱ्या साईडपट्टीवर गवताचे साम्राज्य पसरले आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडांची मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मार्गावर असणारे दिशादर्शक व माहिती फलक या गवतांमुळे व झाडांमुळे झाकून गेले आहेत, तर काही ठिकाणी असणारे फलक खराब झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या - येणाऱ्या वाहन चालकांना वळणांचा अंदाज येत नसून ठिकठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे तसेच टोळ फाट्याजवळ माहिती फलकच नाही.