शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

डिकसळ येथे भरिदवसा चोरी

By admin | Updated: August 18, 2016 04:42 IST

कर्जत तालुक्यातील कर्जत -कल्याण रस्त्यावरील डिकसळ नाक्यावर असलेल्या साई प्रेरणा मेडिकलमध्ये भरदिवसा चोरीची घटना घडली आहे. चोरांनी गल्ल्यातील पाच हजार

नेरळ : कर्जत तालुक्यातील कर्जत -कल्याण रस्त्यावरील डिकसळ नाक्यावर असलेल्या साई प्रेरणा मेडिकलमध्ये भरदिवसा चोरीची घटना घडली आहे. चोरांनी गल्ल्यातील पाच हजार रु पये घेऊन पळ काढला असून नेरळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डिकसळ नाक्यावर साई प्रेरणा मेडिकल आहे. येथे मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास मेडिकलमध्ये दोन मुले आली. त्यावेळी मेडिकलमध्ये एक मुलगी होती. त्यांनी आम्हांला भिंतीवरच्या शोकेसमधील वस्तू पाहिजे असे सांगितले. त्यावेळी मुलगी वस्तू काढत असताना त्या मुलांनी गल्ला उघडून पाच हजार रु पये काढून घेतले. त्यानंतर ते तेथून पसार झाले. दुसरेध् गि-हाईक आल्यानंतर गल्ल्यात पैसे नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.फौ जी.ऐस.गिरी हे करीत आहेत.याआधीही डिकसळमध्ये अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे डिकसळ नाक्यावर पोलीस चौकी उभारावी अशी मागणी ग्रामस्थांकडून अनेक महिन्यांपासून होत आहे. तसा पत्रव्यवहारही नेरळ पोलीस ठाणे, पोलीस उपविभागीय अधिकारी कर्जत, पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आले आहे. परंतु अद्याप याची दखल न घेतल्याने चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे डिकसळ नाक्यावर लवकरात लवकर पोलीस चौकी उभारावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)