शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिघी पोर्ट कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 23:45 IST

दिघी पोर्ट व्यवस्थापनाकडून कामगारांना नेहमीच सापत्न वागणूक दिली जात आहे. आता दिघी पोर्ट प्रशासनाने ७५ कामगारांचे दोन महिन्यांचे फरकबिल व दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) थकवून ठेवले आहे.

बोर्ली पंचतन : दिघी पोर्ट व्यवस्थापनाकडून कामगारांना नेहमीच सापत्न वागणूक दिली जात आहे. आता दिघी पोर्ट प्रशासनाने ७५ कामगारांचे दोन महिन्यांचे फरकबिल व दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) थकवून ठेवले आहे. याविरोधात कामगारांनी गुरुवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.दिघी पोर्टमध्ये एकूण १३० स्थानिक कामगार गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहेत. व्यवस्थापनाकडून कामगारांना दिवाळी बोनस १४ नोव्हेंबरपर्यंत बँक खात्यामध्ये जमा होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ ५५ कामगारांना फरकबिल आणि बोनस देण्यात आला. या संदर्भात दिघी पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तायडे यांच्याकडे कामगारांनी विचारणा केली असता, त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर दिघी पोर्ट मुख्य कार्यालय मुंबई येथील संपर्क साधला असता, जे कर्मचारी भारतीय कामगार सेनामध्ये सभासद आहेत, त्यांना बोनस आणि फरकबिल देण्यात आले असून उर्वरित ७५ कामगारांना बोनस वा फरकबिल जमा झाले नसल्याने कामगारांना सांगण्यात आल्याने त्यांची घोर निराशाच झाली आहे.कामगारांचे पगार उशिराने देणे तसेच पगारवाढीचा फरक थकवून ठेवणे यासाठी २१ ते २४ मे २०१८ या चार दिवसांमध्ये कामगारांनी पोर्टचे काम पूर्णपणे बंद ठेवले होते. यावर दिघी पोर्ट व्यवस्थापनाने काही थकित रक्कम कामगारांच्या अकाउंटमध्ये २५ मे रोजी जमा केले आणि उर्वरित ५0 टक्के फरकाची रक्कम गणपतीत जमा होईल, असे आश्वासन दिले.व्यवस्थापनाचा निषेधगणपती, दिवाळी झाली तरी फरकाची रक्कम दिघी पोर्ट प्रशासनाने अदा केलेली नाही. अखेर कामगारांनी एकजुटीने दिघी पोर्टच्या विरोधात दंड थोपटले आहेत. फरकबिल व सानुग्रह अनुदान मिळाल्याखेरीज आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड