शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

धोदानी बंधारा वाहू लागला

By admin | Updated: July 30, 2016 04:30 IST

राज्यातील भीषण दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष यावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’चा राज्यातील पहिला

अलिबाग : राज्यातील भीषण दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष यावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’चा राज्यातील पहिला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील धोदाणी येथील बंधारा गतवर्षी बांधून पूर्ण झाला. यंदा त्यात सुमारे ३१.२१ टीएमसी जलसंचय झाला. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरून आता वाहत असून एक किमी परिसरातील भूजल पातळीत त्यामुळे वाढ झाली आहे.महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना २६ जानेवारी २०१५ रोजी कार्यान्वित केली. या राज्यस्तरीय योजनेच्या शुभारंभाचा मान रायगड जिल्ह्याला मिळाला. पनवेल तालुक्यातील धोदानी या शिवारात या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते झाली. आदिवासी लोकवस्तीच्या क्षेत्रातील धोदानी बंधाऱ्याकडे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष होते, परिणामी शासकीय यंत्रणा देखील येथे प्रभावीपणे कार्यरत होत्या.धोदानी परिसरातील गट क्र मांक ३, ४ व ५ मध्ये एकूण तीन साखळी सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. हा बंधारा केवळ ९.९८ लाख रु पये खर्चून अवघ्या ४१ दिवसात पूर्ण करण्यात आला. २६ जानेवारी २०१६ रोजी भूमिपूजन, २० फेबु्रवारी २०१५ रोजी प्रत्यक्ष कामास सुरु वात आणि ३१ मार्च २०१५ रोजी बंधाऱ्याच्या कामात अत्यंत गतिमानता येथे अनुभवास आली. बंधाऱ्याच्या बांधाची एकूण लांबी २० मीटर, उंची २.८० मीटर, पाणीसाठा उंची १.५ मीटर तर मुख्य बांधाचा पाया-रु ंदी ०.६० मीटर अशी आहे. बंधारा पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी बंधारा पूर्ण क्षमेतेने भरल्यावर तत्कालीन पालक सचिव गौतम चटर्जी यांच्या हस्ते ८ आॅक्टोबर २०१५ रोजी जलपूजन करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण झाले व पाणी अडविले गेले. त्यामुळे जमिनीतील पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. जलसाठ्यामध्ये साधारणत: एक किलोमीटर परिसरातील जवळजवळ २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजीपाला, फळपिके व चारापिके यांच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परिसराचा खऱ्या अर्थाने विकास होण्यास प्रारंभ झाला.योजनेची उद्दिष्टे पावसाचे पाणी अडविणे, भूगर्भातील पाणी पातळी वाढवणे, सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, ग्रामीण भागातील बंद पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करु न पाणीपुरवठ्यात वाढ करणे.भूजल अधिनियम अंमलबजावणी, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या पण निकामी झालेल्या जलस्रोतांची (बंधारे,गाव तलाव,पाझर तलाव,सिमेंट बंधारे) पाणीसाठवण क्षमता पुनर्स्थापित करणे वा वाढविणे.अस्तित्वातील जलस्रोतामधील गाळ लोकसहभागातून काढून जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी जनजागृती, पाणी अडविणे, जिरविणेबाबत लोकांना प्रोत्साहित करणे, लोकसहभाग वाढविणे असा उद्देश या अभियानाचा आहे.