शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात विविध महोत्सवांचा धूमधडाका

By admin | Updated: December 28, 2015 02:51 IST

कर्नाळा स्पोर्टस अकादमीचे नाव आणि येथील खेळाडूंचे कर्तृत्व महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे.

पनवेल : कर्नाळा स्पोर्टस अकादमीचे नाव आणि येथील खेळाडूंचे कर्तृत्व महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. या यशाचे खरेखुरे श्रेय विवेक पाटील यांनाच जाते, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी काढले. कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या १७व्या कला क्रीडा व सांकृतिक महोत्सावाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते . विवेक पाटील यांनी पाहिलेले ‘मिशन २०२०’चे स्वप्न निश्चित पूर्ण होईल आणि टोकियोत होऊ घातलेल्या आॅलिम्पिकमध्ये या अकदामीचे खेळाडू पदक मिळवतील, असा विश्वासही तटकरेंनी व्यक्त केला. कार्यक्रमास शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ समाजसेवक शंकरशेठ पाटील, रविशेठ पाटील आदी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, की पूर्वी महोत्सवामध्ये ग्रामीण भागातील जनतेचा कल अधिक होता. परंतु तालुक्यात बाहेरून आलेल्या नागरिकांचे प्रमाण वाढल्याने हा महोत्सवात भारतीय एकात्मितेचे दर्शन घडते आहे. १कर्जत : संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने कर्जत महोत्सव २०१५चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रतिमा भालोदकर या संकल्प ‘आजचा आवाज’च्या मानकरी ठरल्या आहेत. येथील पोलीस मैदानावर कर्जत महोत्सव २०१५चे आयोजन करण्यात आले आहे. कर्जतचे पोलीस निरीक्षक रमेश भोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे योगाभ्यास, प्राणायाम, मेडिटेशन व सकारात्मक जीवनशैली, योग यावर प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या कीर्तिमाला यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर जी. डी. फाउंडेशन, खारघर यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांची, विनोबा कर्णबधिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी तपासणी करून घेतली. रात्री संकल्प ‘आजचा आवाज’ या गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन गायक गौतम वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी चैतन्य जोशी, शोभा मित्रगोत्री, स्नेहा पिंगळे, माधवी मित्रगोत्री उपस्थित होते. प्रतिमा भालोदकर यांनी बाजी मारून संकल्प ‘आजचा आवाज’च्या त्या मानकरी ठरल्या. व्दितीय क्र मांक मिळविला विनीत कांबळे, तर उत्तेजनार्थ पारितोषिके रोहित शिंगे आणि राकेश पवार यांनी मिळविली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणूून गौतम वैद्य यांनी यांनी काम पाहिले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन स्नेहा गोगटे आणि स्नेहा पिंगळे यांनी केले. २दुसऱ्या दिवशी सकाळी राजवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे योगाभ्यास, प्राणायाम, मेडिटेशन व सकारात्मक जीवनशैली, योग यावर प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या कीर्तिमाला यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतरआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांची, विनोबा कर्णबधिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी तपासणी करून घेतली. ३रात्री संकल्प ‘आजचा आवाज’ या गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन गायक गौतम वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी चैतन्य जोशी, शोभा मित्रगोत्री, स्नेहा पिंगळे, माधवी मित्रगोत्री उपस्थित होते. प्रतिमा भालोदकर यांनी बाजी मारून संकल्प ‘आजचा आवाज’च्या त्या मानकरी ठरल्या.