शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गाढेश्वर, मोरबे धरणावरील बंदोबस्तामुळे पर्यटकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:58 IST

गाढी नदी माथेरानच्या पायथ्यापासून उगम पावली आहे. ती पुढे गाढेश्वर, उमरोली, शांतीवन, नेरे, कोप्रोली, चिपळे, सुकापूर आदी भागातून ती वाहत जाते.

पनवेल : तालुक्यातील गाढेश्वर, माची प्रबळ, मोरबे धरणावर पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. त्यामुळे शनिवार व रविवारी सहलीसाठी येणाऱ्या असंख्य पर्यटकांचा हिरमोड झाला. त्यांना आल्या पावली परतावे लागले.

गाढी नदी माथेरानच्या पायथ्यापासून उगम पावली आहे. ती पुढे गाढेश्वर, उमरोली, शांतीवन, नेरे, कोप्रोली, चिपळे, सुकापूर आदी भागातून ती वाहत जाते. हा परिसर निसर्गरम्य असल्याने पर्यटकांना नेहमीच या ठिकाणचे आकर्षण असते. शनिवारी व रविवारी सकाळपासून परिसरात नागरिकांची झुंबड असते. काहींनी परिसरात फार्म हाउस घेतले आहेत. मुंबई, पुणे या भागातून असंख्य पर्यटक गाढेश्वर परिसरात येतात. मात्र चोख पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना परत जावे लागत आहे. वाजे फाटा येथे असलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे शेकडो जणांना परत जावे लागले. त्यामुळे पर्यटक नेरे, नेरेपाडा, हरीग्राम, चिपळे आदी परिसरात पाण्यात उतरू लागले आहेत.

गाढी नदीचे पाणी सध्या वाढल्यामुळे पर्यटकांनी पाण्यात न उतरण्याचे आवाहन ग्रामस्थ करत आहेत. मात्र त्याला न जुमानता केवळ मौजमजा करण्यासाठी पर्यटक पाण्यात उतरताना दिसत आहेत. गाढेश्वर व मोरबे धरणावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.धरण परिसरात महापालिकेचे सुरक्षा पथकपनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने गाढेश्वर धरण परिसरात सुरक्षा पथक तैनात करण्यात आले आहे. पावसाळ्यात अनेक नागरिक गाढेश्वर धरण परिसरात फिरावयास येतात. अशावेळी काहीजण उत्साहाच्या भरात हुल्लडबाजी करून स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यात उतरतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पनवेल महापालिकेचे सुरक्षारक्षक नियमितकार्यरत आहेतच. परंतु पावसाळ्यात पाण्यात उतरून जीव धोक्यात घालणारे नागरिक यांना प्रतिबंधाबरोबर खबरदारी म्हणून जीवरक्षक तैनात केले असल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. आपत्कालीनविभागाचे अनिल जाधव व सुरक्षा विभागाचे प्रमुख रमेश पाटील यांनी अचानक भेट देऊन धरण परिसराची पाहणी केली.