शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

निधी असूनही काम नाही

By admin | Updated: October 8, 2015 23:33 IST

रायगड जिल्हा परिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींना दोन कोटी १२ लाख ७ हजार ९२४ रुपयांचा निधी दिला होता. ग्रामपंचायतींच्या

- आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्हा परिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींना दोन कोटी १२ लाख ७ हजार ९२४ रुपयांचा निधी दिला होता. ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेला निधी त्यांच्याकडून खर्च झालेला नाही. ग्रामपंचायतींच्या ढिसाळ कारभारामुळे एक कोटी २७ लाख २४ हजार ७५५ रुपयांचा निधी परत घेण्याची नामुष्की रायगड जिल्हा परिषदेवर ओढवली आहे. जिल्हा परिषदेने निधी परत घेण्याबाबतची प्रक्रिया सुरु केली आहे.संपूर्ण स्वच्छ अभियानाअंतर्गत २०११-१२ या कालावधीत जिल्ह्यामध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे रायगड जिल्हा परिषदेने पक्के केले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ३६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. यासाठी सरकारकडून दोन कोटी १२ लाख ७ हजार ९२४ रुपयांच्या निधीचीही तरतूद झाली. गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधित निधी वर्ग करण्यात आला होता. त्यांनी ४० टक्के निधी वर्गही केला होता. मात्र ग्रामपंचायतींनी कमीअधिक प्रमाणात निधी खर्च केला. शोष खड्डे, लिचपीट, गांडुळखत प्रकल्पासाठी शेडचे बांधकाम या निधीच्या माध्यमातून करायचे होते. मात्र ग्रामपंचायतींनी कामांमध्ये सातत्य ठेवले नाही. विशेष म्हणजे ग्रामपंचायतींनी आपल्या अजेंड्यावर अद्यापही कचरा व्यवस्थापन हा विषय घेतला नसल्याने निधी प्राप्त होऊनही त्यावर चांगले काम होऊ शकले नसल्याने निधी काढून घ्यावा लागत आहे. ग्रामपंचायतींना निधी देऊनही त्यांनी तो खर्च केलेला नाही. निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबतचे पत्र संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्या ग्रामपंचायतींनी काम केले नाही त्यांना समज देण्यात आली असल्याचेही साळुंखे यांनी यावेळी स्पष्ट केले.पहिल्या टप्प्यामध्ये ३६ ग्रामपंचायती : स्वच्छ अभियानाअंतर्गत २०११-१२ या कालावधीत जिल्ह्यामध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे रायगड जिल्हा परिषदेने पक्के केले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ३६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. तालुका ग्रा.पं.निधी खर्चमाणगाव ०७४४,९५,९४४ १७,९८,३७५अलिबाग ०३९,८३,७६१३,९३,५०४महाड०३१८,५६,६७२७,४२,६६८कर्जत ०२१६,५८,२४०६,६३,२९६तळा ०१७,९९,३२०३,१९,७२८खालापूर०१६,४०,०००२,५६,०००पनवेल०३१२,८०,०००५,१२,०००पेण ०३१८,०७,१८१७,२२,८७२श्रीवर्धन ०४२५,४६,२१६१२,१०,४८४मुरुड०२१५,९०,५२०६,३६,२०८म्हसळा०१५,९०,०७०२,३६,०२८रोहे ०२६,४०,०००२,५६,०००उरण०२१०,४०,०००४,१६,०००सुधागड ०१६,४०,०००२,५६,०००पोलादपूर ०१६,४०,०००, २,५६,०००