शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी वाहनांचा उरण डेपोला फटका

By admin | Updated: September 24, 2015 00:25 IST

प्रवाशांची सुरळीत वाहतूक करून नफा मिळवून देण्यासाठी एसटी गाड्या कंडक्टर, ड्रायव्हरची पुरेशी संख्या असतानाही खाजगी, निमशासकीय बस वाहतूकदारांशी वाढत्या स्पर्धेचा जबरदस्त फटका उरण एसटी डेपोला बसला आहे

उरण : प्रवाशांची सुरळीत वाहतूक करून नफा मिळवून देण्यासाठी एसटी गाड्या कंडक्टर, ड्रायव्हरची पुरेशी संख्या असतानाही खाजगी, निमशासकीय बस वाहतूकदारांशी वाढत्या स्पर्धेचा जबरदस्त फटका उरण एसटी डेपोला बसला आहे. मागील दोन वर्षांपासून ३ कोटी ७२ लाखांचा तोटा सहन करण्याची वेळ उरण डेपोवर येऊन ठेपली आहे.उरण परिसरात प्रचंड प्रमाणात होत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे उरण जागतिक व्यापारी केंद्र बनत चालले आहे. त्यामुळे जगाच्या नकाशावरही उरणला महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून स्थान प्राप्त होऊ लागले आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे परिसरात रोजगार आणि व्यापाराच्या निमित्ताने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. दररोज या परिसरातून सुमारे ७५ हजार प्रवासी ये-जा करतात. त्यापैकी २८ हजार एसटी, १५ हजार नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेस तर खाजगी सुमो, स्कॉर्पिओ, ट्रॅक्स, स्टार बसेस आदी ३५० गाड्या दररोज ३५ हजार प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. खाजगी गाड्यांच्या बेकादा वाहतुकीमुळे उरण एसटी डेपोला कोटयावधींचा तोटाच सहन करावा लागत आहे. उरण डेपोकडे ७८ जुनाट गाड्या आहेत. या गाड्यांच्या बळावर पाच मार्गावर ५५६ फेऱ्या मारते, दररोज २८ हजार प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. उरण डेपोच्या अडचणींचा फायदा घेत खाजगी गाड्या अवैध प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. २०१३-१४ या आर्थिक वर्षात डेपोला ३ कोटी ७२ लाखांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती आगार व्यवस्थापक डी.एस.कुलकर्णी यांनी दिली.(वार्ताहर)