म्हसळा : तालुक्यात डेंग्यूने आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली असतानाच उपचाराअभावी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्र वारी ३ नोव्हेंबर रोजी घडली आहे.म्हसळा तालुक्यातील मौजे खारगाव बुद्रुक येथील गीता नीलेश कांबळे (३७) या महिलेला डेंग्यूची लागण झाली असल्याचे समजताच तिने म्हसळा येथील खासगीरु ग्णालयात आपला उपचार सुरू केला. डॉक्टरांनी तब्बल चार दिवस उपचार करून झाल्यावर कांबळे यांची प्रकृती खालावतच चालली आहे असे लक्षात आल्यानंतर त्यांना त्वरित मुंबई येथे नेण्यास सांगितले. मुंबई येथील रुग्णालयात शुक्र वारी दुपारी ३च्या सुमारास दाखल केल्यानंतर दोन तासांनी त्यांचा मृत्यू झाला. तालुक्यातील पंगळोली, आंबेत भागामध्ये देखील डेंग्यूचे रु ग्ण आढळले असून, अद्याप शासन दरबारी या गंभीर रोगाची कोणतीही दखल घेतली नाही.
डेंग्यूने महिलेचा मृत्यू, नागरिकांमध्ये डॉक्टरांबाबत नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 04:26 IST