शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जे.एस.डब्ल्यू कंपनीत डेंग्यूचे संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:00 IST

रक्ताचे नमुने मुंबईत तपासणीसाठी । ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे कंपनीला पत्र

पेण : पेण येथील डोलवी गावच्या हद्दीत असणाऱ्या जे.एस.डब्ल्यू. कंपनीतील कामगारांना डेंग्यूची लागण झाल्याचे गडब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यविषयक पाहणी अहवालात निष्पन्न झाले आहे. कंपनीतील ११ कामगारांना डेंग्यूची लागण झाल्याचे प्राथमिक अहवालातील माहिती गडब प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मनीषा म्हात्रे यांनी तपासणी केलेल्या वैद्यकीय अहवालात दिली आहे. यातील रुग्णाच्या रक्ताचे नमुने जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे पाठविण्यात आले असून तेथील अहवाल आल्यानंतर डेंग्यूची लागण झाल्याबाबतचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. हे सर्व कामगार परप्रांतीय असून कंपनीने बांधलेल्या वडखळ येथील निवाराशेडमध्ये वास्तव्यास आहेत.

कंपनीच्या फिल्डमधील काम सुरू असलेल्या एलएनटी आणि टाटा प्रोेजेक्ट साइडवर डेंग्यू आणि डासांचा फैलाव व डेंग्यूच्या अळ्या आढळल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले आहे. यातील डेंग्यूची लागण झालेल्या ५ कामगारांना सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग तर ६ कामगारांना प्राथमिक आरोग्य केंदाकडे गडब येथे उपचारार्थ दाखल केले आहे.

जे.एस.डब्ल्यू कंपनीत फिल्डवर काम चालू असलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या व डासांचा उपद्रव असून त्याबाबत आरोग्य पथकाच्या तपासणी अहवालात आढळले आहे. यातील लागण झालेले ११ संशयित रुग्ण उपचारार्थ अलिबाग व पेण येथे दाखल करण्यात आले.

कामार्लीत दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण

कामार्ली येथे दूषित पाणीपुरवठा झाल्याने परिसरातील ३० ते ३५ गावकऱ्यांना अतिसार, उलटीची लागण झाली. संबंधित रुग्णांना पेण उपजिल्हा रुग्णालय, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी १० वाजल्यापासून ग्रामस्थांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रुग्णांना औषध, गोळ्या देऊन सोडण्यात आले. मात्र, त्यानंतरही अनेकांना फरक न पडल्याने अनेकांनी पेण शहरात धाव घेतली. पेण उपजिल्हा रुग्णालयात १७, खासगी दवाखान्यात आठ व कामार्ली येथे दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पेण तालुका आरोग्य अधिकारी, पेण तहसीलदार यांनी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणीकेली आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूMumbaiमुंबई