शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

माघी गणेशोत्सवासाठी पेणच्या मूर्तींना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:16 IST

मूर्तिकारांची लगबग सुरू; १००० गणेशमूर्तींची कार्यशाळांमध्ये ऑर्डर बुक

- दत्ता म्हात्रे पेण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेशाचा माघी गणेशोत्सव सोहळा शुक्रवार, ८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या गणेश जयंती वरद विनायक चतुर्थीच्या दिवशी माघी गणरायाचे आगमन होत असून माघी गणेशोत्सवाची चाहूल लागल्याचे पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये दिसून येत आहे. मूर्तिकारांकडे तब्बल १००० च्या वर बाप्पांच्या सुबक मूर्तीची मागणी विविध शहरांमधून करण्यात आली आहे. यासाठी पेणमधील विविध कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तीच्या कामाला वेग आला आहे. सार्वजनिक मंडळाच्या ६६ तर खासगी ९३४ गणेशमूर्ती तयार करून ५ ते ६ फेब्रुवारीपर्यंत गणेशभक्तांना देण्यासाठी लगबग सुरू असल्याचे दीपक कला केंद्राचे मूर्तिकार सचिन व नीलेश समेळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शुक्रवार, ८ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती आहे. माघ महिन्यातली विनायक, वरद, तिलकुंद चतुर्थीचा शुभयोग असून पूर्वापार गणेशमंदिरात थाटात साजरा होणारा या उत्सवाने आता गणेशभक्तांच्या हौसे मौजेखातर सार्वजनिक व खासगी अशा दोन्ही स्वरूपात माघी गणेशोत्सवाचे स्वरूप धारण के ले आहे. गेल्या दशकभरात या उत्सवाची क्रेझ चांगलीच बाळसे धरत मोठे स्वरूप धारण करीत आहे. सध्या माघ महिन्यात थंडी असूनसुद्धा पेणच्या गणेशमूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तींची रंगरंगोटी करण्याकडे मोठी लगबग सुरू आहे. ११ ते १२ फूट उंचीच्या सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या गणेशमूर्ती रंगविण्यासाठी कार्यशाळांमध्ये आणल्या जात आहेत. प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या या गणेशमूर्ती कलाग्राम जोहे हमरापूर येथील कार्यशाळांमधून पेण शहरातील मूर्तिकार आणतात. ५ फूट उंचीपासून ८ फुटी, १० व १२ फूट उंचीच्या या भव्य गणेशमूर्ती या ठिकाणचे मूर्तिकार कच्च्या अर्थात न रंगविलेल्या गणेशमूर्ती तयार करून आणतात. फुटीच्या मोजमापानुसार त्यांची किंमत ठरलेली असते.पुणे येथून गणेशमूर्तींना मागणीपेण शहराचा लौकिक कोकणातील सांस्कृतिक शहर म्हणून केला जातो. गणेशमूर्तिकारांनी सातासमुद्रापार या शहराची ख्याती नेली. मूर्तिकारांमध्ये श्रीकांत देवधर, दीपक समेळ यांचे नाव आंतरराष्टÑीय स्तरावर घेतले जाते. पुणे येथून माघी गणेशोत्सवात गणेशमूर्तींना मोठी मागणी असल्याचे कार्यशाळेतील कलाकारांनी सांगितले. गणेश मंदिरात विधिवत साजरा होणारा हा माघी गणेशोत्सव आता थेट घराघरात व सार्वजनिक सभामंडपात साजरा होतोय. पेणमधील विविध कार्यशाळांमध्ये पुणे, ठाणे, पालघर, वसई, पनवेल, उरण, खालापूर, मावळ व नाशिक, डोंबिवली येथील आॅर्डर बुकिंग केल्याचे मूर्तिकार दीपक समेळ यांनी सांगितले.