शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या चौकशीची मागणी

By admin | Updated: December 16, 2015 00:54 IST

येथील दोन तरु णांचे मृतदेह संशयास्पदरीत्या मुंबईतील कुर्ला व भांडुप रेल्वे स्थानकांमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली असून नातेवाइकांनी घातपाताची शक्यता वर्तविल्याने

खोपोली : येथील दोन तरु णांचे मृतदेह संशयास्पदरीत्या मुंबईतील कुर्ला व भांडुप रेल्वे स्थानकांमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली असून नातेवाइकांनी घातपाताची शक्यता वर्तविल्याने या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी खोपोलीतील हे दोन तरुण आपल्या तीन मैत्रिणींसह मुंबईला गेले होते. त्यापैकी दोघांचे मृतदेह मुंबईत वेगवेगळ्या रेल्वे स्थानकात आढळले, तर यांच्या सोबत असणाऱ्या अन्य तिघांचा ठावठिकाणा लागला नसल्याने मृत तरु णांच्या नातेवाइकांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. खोपोलीतील वासरंग परिसरात राहणारा निहाल गौतम शिंदे याचा ७ डिसेंबरला वाढदिवस होता. निहाल आपला मित्र दीपेश वाघेला व तीन मैत्रिणींसह वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईत गेला होता. ८ डिसेंबरला कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जाधव यांनी फोन करून निहालचे वडील गौतम शिंदे यांना निहालचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी दिली. निहालचा मृतदेह मिळाला असला तरी त्याच्या सोबत गेलेला मित्र दीपेश वाघेलाचा काहीच तपास लागत नव्हता. दोन दिवसांनी म्हणजे १० डिसेंबरला भांडुप स्थानकात दीपेशचा मृतदेह मिळाला. हे दोन्ही तरुण रेल्वे अपघातामध्ये ठार झाल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे. दीपेश व निहालच्या नातेवाइकांनी मात्र या प्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. दोन्ही तरुणांच्या शरीरावर मारहाणीच्या खुना असल्याची माहिती गौतम शिंदे यांनी दिली असून दोघेही रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडले असतील तर त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी कसे मिळाले असा प्रश्न उपस्थित केला आहे. (वार्ताहर)निहालच्या मोबाइलमध्ये असलेल्या फोटोमध्ये त्यांच्या सोबत आणखी तीन तरुणी असल्याचे दिसते. या तरुणींचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी गौतम शिंदे यांनी कुर्ला रेल्वे पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांकडे लेखी पत्र देवून केली आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर काढण्याची मागणी दीपेश व निहालच्या नातेवाइकांनी केली आहे.