शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 02:06 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील पनवेल ते इंदापूर या ८४ किमी लांबीमधील पहिल्या टप्प्याचे काम सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते.

बिरवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील पनवेल ते इंदापूर या ८४ किमी लांबीमधील पहिल्या टप्प्याचे काम सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते. त्यावेळी प्रकल्पाची किंमत ९४२.६९ कोटीचा करारनामा २९ जानेवारी २0११ रोजी झाला होता. त्यानुसार १३ जून २0१४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करावयाचे होते. आज २०१८ साल उजाडले, मात्र काम काही पूर्ण झाले नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या लेखी निवेदनात आ. भरत गोगावले यांनी नमूद केले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करणे व रस्त्याच्या डागडुजीचे काम गणेशोत्सवापूर्वी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.या टप्प्यामधील पळस्पे ते वडखळमधील काम सुप्रीम कंपनीकडून काढून ते जे.एम. म्हात्रे कंपनीला देण्यात आल्याने या पहिल्या टप्प्यातील कामाची प्रगती आहे. मात्र वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या रस्त्याची अवस्था वाईट आहे. पुलाची कामे अर्धवट अवस्थेत तर आहेतच पण १ किमी देखील रस्ता व्यवस्थित नाही. वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज वाहतूककोंडी व अपघाताचे सत्र चालूच आहेत.राष्ट्रीय महामार्गाची डागडुजी पावसाळ्यापूर्वी न केल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गोगावले यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ मधील वडखळ ते इंदापूर या रस्त्याच्या दुरवस्थेला (एन.एच.ए.आय.) नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया हेच जबाबदार आहेत असा आक्षेप घेवून वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाल्याचे सांगितले. ४ वर्षांपासून डोंगरातील माती रस्त्यावर वाहून येणे, पावसाळ्यात रस्त्यात गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होतात असे नमूद करून भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाली का? असेही म्हटले आहे. रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्याबाबत रस्ते विकास महामंडळाच्या प्राधिकरणाला निर्देश द्यावे अशी मागणी आ. गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.