शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भावना दुखावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: March 27, 2016 02:19 IST

चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या दरम्यानच चवदार तळ्याचे ब्राह्मणांकडून विधिवत जलपूजा करून तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा

महाड : चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या दरम्यानच चवदार तळ्याचे ब्राह्मणांकडून विधिवत जलपूजा करून तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी २९ मार्चला महाडमध्ये आंबेडकरी जनतेची निषेध सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष मोहन खांबे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.शिवसेना आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे आयोजित केलेल्या जलजागृती सप्ताहानिमित्त १९ मार्चला ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाण्याचे ब्राह्मणांकडून जलपूजन करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर झळकताच संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महाडमधील सर्व दलित संघटना एकत्रित आल्या असून, या जलपूजनाच्या घटनेबाबत आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे खांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आ. भरत गोगावले यांना चवदार तळ्याचा इतिहास ज्ञात असतानाही आ. गोगावले यांनी हे जलपूजन ब्राह्मणांकडून कसे करून घेतले, असा सवाल खांबे यांनी यावेळी केला. दलित जनतेच्या यामुळे भावना दुखावणार होत्या याची कल्पना त्यांना असताना वास्तविक आ. गोगावले यांनी त्या जलपूजेला आक्षेप घ्यायला हवा होता, मात्र त्यांनी तो घेतला नाही. चवदार तळ्याचे पाणी एखाद्या कलशात भरून ते जलसंपदा विभागाच्या कार्यक्रमात नेऊन त्याचे जलपूजन केले गेले असते तर एक चांगला संदेश गेला असता, मात्र हा प्रकार जाणीवपूर्वक केला गेल्याचा आरोप मोहन खांबे यांनी पत्रकार परिषदेत केला असून, केवळ दलित जनतेच्या भावना दुखावण्यासाठीच हे जलपूजन केल्याचे खांबे यांनी सांगितले.२९ मार्चला या घटनेच्या निषेधार्थ चवदार तळ्याच्या प्रांगणात भव्य निषेध सभा घेण्यात येणार असून, सभेनंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मोहन खांबे यांनी यावेळी दिली.