शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमधील पेमास्टर उद्यानाची दुरवस्था, गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 03:06 IST

नैसर्गिक देणगी लाभलेले माथेरानमधील सर्वात उंच स्थानी अर्थातच समुद्रसपाटीपासून जवळपास ८२७ मीटर उंचीवर विराजमान झालेले पेमास्टर उद्यान सर्वांनाच नेहमी भुरळ घालत असते.

मुकुंद रांजणे माथेरान : नैसर्गिक देणगी लाभलेले माथेरानमधील सर्वात उंच स्थानी अर्थातच समुद्रसपाटीपासून जवळपास ८२७ मीटर उंचीवर विराजमान झालेले पेमास्टर उद्यान सर्वांनाच नेहमी भुरळ घालत असते. मात्र या ब्रिटिशकालीन उद्यानाची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पेमास्टर उद्यानाला गतवैभव प्राप्त व्हावे अशी पर्यटकांकडून मागणी होत आहे.काही वर्षांपासून पेमास्टर उद्यान आणि बाजारपेठेच्या ठिकाणी असलेले नौरोजी उद्यानाची ठेकेदारामार्फत देखभाल करून घेतली जात आहे. त्यामुळे काहीअंशी ही उद्याने सुस्थितीत आहेत,परंतु झाडे वेलींनी बहरलेली नाहीत. फुलांची रोपे अल्प प्रमाणातच आहेत. रस्ते खडबडीत झालेले दिसत आहेत. बसण्याची आसन व्यवस्था कुचकामी ठरत आहे. झोपाळ्यांना गंज चढलेला असून काही झोपाळे बंद आहेत. माहिती फलक सुद्धा स्पष्टपणे दिसत नाहीत. घसरगुंडी तसेच अन्य खेळांचे साहित्य भंगारात जाण्यायोग्यच आहे. पेमास्टर उद्यान हे माथेरानची शान आहे. या उद्यानाच्या चोहोबाजूला अनेक हॉटेल्स असून या उद्यानातील मार्गातून पर्यटकांची नित्याचीच वर्दळ पहावयास मिळते. क्षणभर विश्रांतीसाठी या उद्यानांची सुयोग्य पद्धतीने जोपासना होणे नितांत गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात केव्हाही इतिहासजमा होतील अशीच भीती स्थानिक मंडळींना तसेच पर्यटकांना होत आहे.देशातील बहुतांश स्थावर मालमत्ता या ब्रिटिशकालीन आहेत. मात्र या मालमत्तेची देखभाल नगरपालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे.>आम्ही लहानपणापासूनच माथेरानला नियमितपणे येत आहोत. त्यावेळेस आठ ते दहा दिवसांचा मुक्कामी दौरा होत असे. त्यावेळेस हे गाव अत्यंत सुंदर आणि थंड हवेने परिपूर्ण व्यापलेले असायचे. पेमास्टर उद्यानात दररोज सायंकाळी फेरफटका मारायचो. पूर्वीची ती सुंदरता सध्या येथे दिसत नाही. पर्यटकांकडून पन्नास रु पये प्रवासी कर घेतला जातोय, त्यांच्या पैशांचे काहीतरी चीज व्हायलाच हवे तरच येथे आणखी पर्यटक वाढतील आणि सगळ्यांना चांगला रोजगार उत्पन्न मिळेल.- निशिकांत देसाई, पर्यटक मुंबई

टॅग्स :Matheranमाथेरान