शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिकारांची घटती संख्या चिंतेची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:55 IST

तालुक्यातील गावोगावी पारंपरिक मूर्तिकारांनी वडीलधाºयांच्या मार्गदर्शनाखाली ही कलाकुसर जतन केली आहे. तरुण पिढीने ती अंगीकारून पुढे चालविली आहे.

रोहा : तालुक्यातील गावोगावी पारंपरिक मूर्तिकारांनी वडीलधाºयांच्या मार्गदर्शनाखाली ही कलाकुसर जतन केली आहे. तरुण पिढीने ती अंगीकारून पुढे चालविली आहे. पेण नगरीप्रमाणे रोहा शहर आणि ग्रामीण भागात हा व्यवसाय वर्षाचे बारा महिने सुरू राहात नाही. केवळ काही महिन्यांपुरताच मूर्तिकारी व्यवसाय मर्यादित राहात असल्याने इतर वेळी नोकरी व कामासाठी गावाबाहेर जावे लागते. परिणामी मूर्तिकारांची दिवसेंदिवस घटणारी संख्या हा चिंतेचा विषय असल्याचे समोर आले आहे.रोहा शहरातील अष्टमी, दमखाडी, धनगर आळी आणि सोनार आळीत तसेच सोनगाव, उडदवणे, सानेगाव, यशवंतखार, महादेवखार, चांडगाव, चणेरा, बुरूमखान, वरसे कोलाड, किल्ला आदी तालुक्यातील गावात आजही मूर्तिकार शाडूच्या मातीपासून श्रीगणेशाची मूर्ती घडविताना दिसून येतात. मूर्तिकारी व्यवसायाला वर्षाचे बारा महिने हाताला काम नसल्याने या मूर्तिकारांचा हिरमोड होतो, त्यातच महागाईबरोबर वाढलेल्या शाडूच्या मातीचे आणि रंगांच्या दरांमुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. मजुरीच्या दरात जरी काही प्रमाणात वाढ झाली असली तरी मूर्तिकारांना त्याच्या कलेचा योग्य मोबदला मिळत नसल्याचे मूर्तिकार सांगतात.रोहा शहर व तालुक्यात साधारण ७५ ते ८० मूर्तिकार व तेवढेच रंगकाम करणारे आहेत. लहान मोठ्या मिळून साधारण दोन हजार मूर्ती दरवर्षी येथे घडविल्या जातात. यातील पाच ते दहा टक्के मूर्ती विक्र ी न होता शिल्लकही राहात असल्याचे सांगण्यात आले. या व्यवसायातून तालुक्यात ५५ लाख रुपयांची उलाढाल होत असते.