शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याचे उत्पादन घटल्याने भाव वाढले; डझनाला मोजावे लागतात १००० ते १५०० रु.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 23:47 IST

डझनाला मोजावे लागतात १००० ते १५०० रु.

गिरीश गोरेगावकरमाणगाव : एप्रिल महिना संपला तरी बाजारात हापूस आंबा म्हणावा तसा आला नाही. थोड्या प्रमाणात विक्रीसाठी आलेल्या हापूसच्या डझनाचा भाव १००० ते १५०० रुपये आहे. बदलते हवामान व अवकाळी पावसाचा फटका आंबा व इतर फळपिकांना बसला आहे. ऐन मोहोर प्रक्रिया सुरू असताना अवकाळी पावसामुळे फळधारणा झाली नाही.

रानमेव्याचे माहेरघर असलेल्या माणगाव तालुक्यात यावर्षी हापूस व रायवळ आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळात अनेक बागा व कलम उन्मळून पडल्याने हापूस व इतर आंब्याचे उत्पादन ६० ते ७० टक्के कमी होणार आहे. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेला हापूस हा देवगडचा असला तरी तो वाशी मार्केटमधून आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. उत्पादन कमी असल्याने यावर्षी हापूस आंबा डझनाला १००० रुपये व अधिक किमतीला मिळत आहे.गे

ल्यावर्षी ५०० ते ६०० रुपये डझन असलेला आंबे यावर्षी महाग झाल्याने सर्वसामान्यांना हापूस आंब्याची चव अजून चाखता आली नाही. आवक वाढेल तशी किमती कमी होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.आंबे विक्री करणाऱ्या पाणोसे येथील शेतकरी शंकर मांडवकर यांना सांगितले की, सुरुवातीला आंब्याना चांगला मोहोर आला होता. मात्र, डिसेंबर महिन्यात पडलेल्या पाऊस धुरक्यामुळे सगळा मोहोर गळून गेला. त्यामुळे रानात अगदी तुरळक आंबा दिसत आहे. दरवर्षी पाच ते दहा हजार उत्पन्न देणारे हे फळ न आल्याने नुकसान झाले आहे.

टॅग्स :MangoआंबाRaigadरायगड