शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात झाली घट;सरकारी प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 23:28 IST

१५ वर्षांत फक्त १५ सोनोग्राफी सेंटर्सवर कारवाई

निखिल म्हात्रे

अलिबाग : वैद्यकीय सोईसुविधांमुळे प्रसूतिदरम्यान नवजात बालकांचे दगावण्याचे प्रमाण घटत असले, तरी रायगड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सातत्याने घटत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तराची आकडेवारी लक्षात घेतली, तर रायगड जिल्ह्यातही कोवळ्या कळ्यांना जन्माआधीच मारले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात नेहमीच लिंगगुणोत्तराचे प्रमाण चांगले राहिले आहे. मात्र, वाढत्या वैद्यकीय सोईसुविधा पाठोपाठ आता हे प्रमाण घटण्यास सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता कोकणातही गर्भलिंगनिदान करून गर्भपात केले जात नाही ना, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यात यास फारशे यश येत नसल्याचे दिसून येत आहे. गर्भाचे लिंगनिदान करून गर्भपात करण्याच्या घटना वाढल्याने सोनोग्राफी सेंटरवर निर्बंध घातले.

१५ वर्षांत १५ सोनोग्राफी सेंटर्सवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी सहा प्रकरणांत सोनोग्राफी सेंटर्स चालवणाऱ्या डॉक्टारांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली, तर चार डॉक्टारांचा मेडिकल कौन्सिलने दिलेला परवाना पाच वर्षांसाठी रद्द केला. उर्वरित डॉक्टरांना नोटिसा बजावल्या. ही सर्व प्रकरणे अनियमिततेशी निगडित होती. ज्यात प्रामुख्याने रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणे, परवान्यांचे नूतनीकरण न करणे अशा स्वरूपाचे होते.

व्यापक समाजप्रबोधनाची गरज आहे. यासाठी महिलांनीच पुढाकार घेत आपल्या कुटुंबीयांचे मतपरिवर्तन करायला पाहिजे. गर्भनिदान रोखण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कायद्याच्या दहशतीबरोबरच जन्मदात्री खंबीर राहिली, तर स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार थांबतील.-अ‍ॅड. नीता कोळी, विधि समुपदेशक

टॅग्स :Raigadरायगड