शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भाडेवाढ स्थगितीचा निर्णय लवकरच घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:41 IST

जेएनपीटी बंदर वसाहतीचा प्रश्न; बोर्ड ऑफ ट्रस्टची मंजुरी आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत

उरण : जेएनपीटी बंदराच्या वसाहतीमधील रहिवासी आणि वाणिज्य संकुलाच्या दुपटीने केलेल्या भाडेवाढीचा प्रस्ताव येत्या ट्रस्टीच्या बैठकीतच मांडला जाईल. ट्रस्टीच्या बैठकीत मंजुरीनंतरच स्थगितीबाबत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रशासनाचे वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयंत ढवळे यांनी दिली.जेएनपीटी बंदर प्रशासनाने कामगार वसाहतींमधील रहिवासी आणि वाणिज्य संकुलाच्या भाड्यात दुपटीने वाढ केली आहे. जुलै महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरमसाट भाडेवाढीचा निर्णय घेतल्यामुळे रहिवासी आणि व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होरपळून जाणाºया वसाहतीमधील रहिवाशांसह काही कामगार संघटनांनीही अचानक दुपटीने करण्यात आलेली भाडेवाढ रद्द करण्याची मागणी जेएनपीटी बंदर प्रशासनाकडे केली होती.भाडेवाढ रद्द करण्यासाठी रहिवासी, व्यापारांनी उरणचे आमदार महेश बालदी यांचीही भेट घेऊन मागणी केली होती. या मागणीनंतर बालदी यांनी भाडेवाढी संदर्भात केंद्रीय मंत्री, तसेच जेएनपीटी बंदराचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्याबरोबर चर्चा करून भाडेवाढीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी (६) वसाहतीमधील रहिवाशांची शिष्टमंडळाने जेएनपीटी बंदराच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, प्रशासनाचे वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयंत ढवळे, मनिषा जाधव, शिष्टमंडळातील गणेश ठाकूर, रामदास पाटील, विकास पाटील, प्रदीप कडू, सूरज पवार, गिरीष म्हात्रे, सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश कडू उपस्थित होते. यावेळी अधिकारी शिष्टमंडळ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.जेएनपीटी प्रशासनाकडून ३१ मार्च, २०२१ पर्यंत भाडेवाढीला स्थगिती देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या ट्रस्टीच्या बैठकीत मांडला जाईल. ट्रस्टीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच स्थगितीबाबत अंतिम निर्णय होईल.-जयंत ढवळे, वरिष्ठ प्रबंधक, सेक्रेटरी, जेएनपीटी

टॅग्स :JNPTजेएनपीटी