शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जेट्टीबाबतचा निर्णय गुरुवारी होणार; विकासमंत्र्यांच्या दालनात विशेषसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:41 IST

सुनील तटकरे यांनी केली मुरुड तालुका नाखवा संघाबरोबर चर्चा

आगरदांडा : मासळीची विक्री करण्यासाठी जेट्टी आपणास उपलब्ध होण्यासाठी गुरुवार, १३ आॅगस्ट रोजी मत्स्य विकासमंत्री यांच्या दालनात विशेष सभा आयोजित केली आहे. नाखवा संघाच्या तीन प्रतिनिधींनी तिथे यावे व त्या ठिकाणीच आपल्या जेट्टीबाबतचा निर्णय होईल. मच्छीमारांना आवश्यक असलेली तातडीने तात्पुरत्या स्वरूपाच्या जेट्टीबाबतचा निर्णय मत्स्य विकास राज्यमंत्री यांच्या समक्ष घेण्यात येईल, असे अभिवाचन खासदार तटकरे यांनी मुरुड तालुका नाखवा संघाला दिले.अगरदांडा बंदरात मच्छीमारांना मासळी विकण्यासाठी जेट्टी मिळावी, या आपल्या प्रमुख मागणीसाठी राजपुरी दिघी, एकदरा व मुरुड परिसरातील सर्व नाखवा मंडळी एकत्र येत, मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समन्वयक प्रकाश सरपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे सागरी आंदोलन करून शासनाचे लक्ष्य वेधले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील मासळीची मोठे मार्केट बंद असल्याने मच्छीमारांना आपली मासळी विकता येत नव्हती, त्यामुळे आम्हाला आगारदांडा बंदरात तातडीने तात्पुरत्या स्वरूपात नवीन जेट्टी बांधून मिळावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. त्या अनुषंगाने मोठे सागरी आंदोलन झाले होते. या आंदोलनाची दखल रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली असून, मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सोमवारी आगरदांडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन जेट्टीची पाहणी केली.यावेळी मच्छीमारांनी आपली समस्या मांडताना मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समन्वयक प्रकाश सरपाटील यांनी आगरदांडा जेट्टी ही मच्छीमारांसाठी योग्य व सुरक्षित असून, आम्हाला येथे मासळी व्यवसायाकरिता पुढील मोठ्या मच्छीमार बंदराची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सुविधा तयार करून मिळावी. कारण समुद्रातून पकडलेली मासळी विकण्यासाठी व्यवस्था नसल्याने, पकडलेली मासळी वाया जात असल्याचे खासदार तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समनव्यक प्रकाश सरपाटील चेअरमन महेंद्र गार्डी, जनार्दन गोवारी, लक्ष्मण मेनदाडकर, जगन्नाथ वाघरे, नारायण गोलान, धुरवा लोदी, चेअरमन पांडुरंग आगरकर, बबन शेखजी, तहसीलदार गमन गावित, तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, अतिक खतीब, सहायक पोलीस निरीक्षक रंगराव पवार, माजी शहर अध्यक्ष हसमुख जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कोळी समाजाने फेडरेशन तयार करावेरायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, तातडीने जेट्टी जरी मंजूर केली, तरी याला दीड वर्ष तरी उभारणीसाठी लागणार आहे. मच्छीमारांना कायमस्वरूपी जेट्टी मिळाली पाहिजे, मासळीला वाढती मागणी असून, शीतगृहसुद्धा विकसित करता आले पाहिजे,कोळी समाजाने फेडरेशन तयार करून आपला विकास साधला पाहिजे, मासेमारीबरोबरच विविध प्रक्रिया करणारी साधनेसुद्धा निर्माण केल्यास लोकांना सुविधा व पैसेसुद्धा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे खा.सुनील तटकरे म्हणाले.