शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागेश्वरी नदी बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: July 28, 2016 03:46 IST

तुडील येथील इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा नागेश्वरी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. घरी जाण्याच्या मार्गावर विरुद्ध दिशेला हा विद्यार्थी नदीत बुडाल्याने या विद्यार्थ्याचा

दासगाव/महाड : तुडील येथील इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा नागेश्वरी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. घरी जाण्याच्या मार्गावर विरुद्ध दिशेला हा विद्यार्थी नदीत बुडाल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यूबाबत संशय व्यक्त होत आहे. असद इनायत बीया (१६, रा. चिंभावे) असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे.असद बीया हा विद्यार्थी तुडील येथील हसनखान देशमुख व पाशा मिया खतीब उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत होता. मंगळवारी २६ जुलै रोजी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर तो घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. त्यावेळी असदचा मृतदेह शाळेशेजारीच रावढळ गाव हद्दीत नागेश्वरी नदीच्या पात्रात सापडला. या प्रकरणी मुश्ताक बीया यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार असद हा शाळा सुटल्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेला आणि त्या ठिकाणी त्याचा पाय घसरून नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तर शाळेत काही विद्यार्थ्यांच्यात वाद झाला आणि या वादामुळे तणावाखाली येवून असदने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. घरी जाण्याचा मार्ग आणि घटनास्थळ हे दोन्ही बाजूला असल्याने गावातील या चर्चेला पुस्ती मिळत आहे. मात्र मृत असदच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस तपास करत आहेत.(वार्ताहर)घरी जाण्याचा मार्ग आणि घटनास्थळ हे दोन्ही बाजूला असल्याने गावातील या चर्चेला पुस्ती मिळत आहे. मात्र मृत असदच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.