शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दहीवलीत काव्यवाचनाने रंगले स्नेहसंमेलन

By admin | Updated: January 4, 2016 02:01 IST

‘पडद्यावर राष्ट्रगीत दिसते तेव्हा उभे राहतो आम्ही..., ‘जेवताना आजोबा लाडात येत मला आपल्या ताटातील भाकर देत..., हा असा पाऊस पडत असताना..

कर्जत : ‘पडद्यावर राष्ट्रगीत दिसते तेव्हा उभे राहतो आम्ही..., ‘जेवताना आजोबा लाडात येत मला आपल्या ताटातील भाकर देत..., हा असा पाऊस पडत असताना..., काळ्या आईच भांडण..., एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवला बाहेर थांबवतो..., ओळखलंत का सर मला..., थँक गॉड कुसुमाग्रज तुमच्या वेळी इंटरनेत नव्हतं... अशा मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, वैभव वैद्य, समीर सावंत, संदीप खरे या प्रसिद्ध लेखकांच्या एकापेक्षा एक कवितांचे वाचन करून उपस्थितांची वाहवा मिळविली. येथील दहीवली विभागात असलेल्या छत्रपती शिक्षण मंडळ संचालित जनता विद्या मंदिर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसिद्ध कवींच्या कवितावाचनाने रंगला. या प्रसंगी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे वाचन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या समारंभाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.विद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर कवी व लेखक विजय उतेकर, छत्रपती शिक्षण मंडळाचे चिटणीस वेणुनाथ कडू आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक किशोर तळेले यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात विद्यालयाचा चढता आलेख सांगितला. शमा सिद्दिकी या विद्यार्थिनीने वार्षिक अहवाल सादर केला. कवी व लेखक विजय उतेकर यांनी मार्गदर्शन केल्यानंतर नगराध्यक्ष राजेश लाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वेणुनाथ कडू यांनी भाषणात ज्ञान, रचना वाद व ज्ञानसाधना यांचा ऊहापोह करून जगाचा इतिहास आपल्याला माहीत असतो, परंतु आपल्या परिसराचा इतिहास माहित नसतो, तसेच इतिहासातील अनेकांच्या पिढ्या पाठ असतात, परंतु आपले पूर्वज हे माहीत नसतात; त्याची प्रथम माहिती करून घ्या, असा सल्ला दिला. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रतिभा उपासनी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)