शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारी चौलनगरीत घुमणार दत्तनामाचा गजर

By निखिल म्हात्रे | Updated: February 27, 2024 17:23 IST

श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबागचे अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या पादुकांच्या पायी पालखी परिक्रमेणेचे आयोजन करण्यात आले आहे.

अलिबाग - चौल भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरातून दत्तमहाराजांच्या पादुकांचा पायी पालखी परिक्रमा सोहळ्यास गुरुवार, दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी सात वाजता सुरुवात होणार आहे. दरवर्षी पार पडणाऱ्या या सोहळ्यास वर्षागणिक उत्सवाचे स्वरुप प्राप्त होत असून, त्यानिमित्त चौलनगरी दत्तनामाच्या गजरात दुमदुमून जाणार आहे. यंदाचे हे पालखी परिक्रमेचे पाचवे वर्ष आहे.

श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबागचे अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या पादुकांच्या पायी पालखी परिक्रमेणेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पर्वतनिवासी दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान असलेल्या संपूर्ण भोवाळे डोंगराला पालखी प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. यादरम्यान दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष, टाळ मृदंगाचा गजर, पादुका आणि मूर्तीवर पुष्पवृष्टी, मंदिरात विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर भाविकांची गर्दी होत असते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबाग विश्वस्त मंडळ संस्थापक अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सागर कुंड, चौल ग्रामस्थ व दत्तभक्त मेहनत घेत आहेत. सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी 9326968878 या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

असा असेल पालखीचा मार्गही पालखी चौल भोवाळेमार्गे मुख्य रस्त्यावरुन चौलनाका, चौल भाटगल्ली, सागमळा, चौलमळा येथून पुढे देवघर, सराई, हनुमानपाडा अशी मार्गक्रमणा करीत भोवाळे येथून दत्तमंदिरात मार्गस्थ होणार आहे. दरवर्षी पालखीच्या वाटेवर ठिकठिकाणी दत्तभक्त तसेच ग्रामस्थांकडून पिण्याचे पाणी आणि सरबत, मध्यान्ह भोजनाचीही व्यवस्था करण्यात येते. सुवासिनींकडून पालखी औक्षण करण्यात येते. पालखी परिक्रमेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मंदिरात महाआरती होणार आहे. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग