शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पोशीर नदीपूल वाहतुकीस धोकादायक, लोखंडी सळ्या बाहेर आल्याने अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 02:51 IST

नेरळ : कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील पोशीर नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील पोशीर नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने एखादा मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न चालक व प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.कर्जत-मुरबाड हा महत्त्वाचा राज्य मार्ग असून, दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबरच दिवसरात्र अवजड वजनाची वाहतूक सुरू असते. या रस्त्यावरील कळंब गावाजवळ पोशीर नदीवरील पुलावर लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुलावरील निघालेल्या सळ्या टायरमध्ये घुसून वाहनांचा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन भरधाव वेगात असल्यास ते नदीतही पडू शकते. अशी दुर्घटना घटना घडू नये यासाठी बांधकाम विभागाने वेळीस यावर उपाययोजना कराव्यात. पुलाचे संरक्षण कठडेही कमकुवत झाले असून त्याचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अनेक महिन्यांपासून पुलावरील रस्त्यावर असलेल्या सळ्या उखडल्या आहेत. शिवाय खड्ड्यांमुळे वाहन उसळत असल्याने आरोग्याच्या व्याधीही उद्भवत असल्याचे प्रवासी सांगतात. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवासी वाहनचालकांकडून केली जात आहे. यासंदर्भात कर्जत बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता अनिल करपे यांच्याशी या कर्जत-मुरबाड रस्त्यावरील नादुरुस्त रस्त्यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील पोशीर नदीवरील पुलावर अनेक महिन्यांपासून लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. असे असताना बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे अपघात घडण्याआधी मार्गाची दुरु स्ती करावी. अन्यथा येथे अपघात घडल्यास बांधकाम विभागाला जबाबदार धरले जाईल. - धनेश राणे, सामाजिक कार्यकर्ते.पोशीर नदीवरील मार्गावर वाहन चालवणे म्हणजे एक प्रकारे कसरत झाली आहे. लोखंडी सळ्या टायरला लागून किंवा रस्त्यावर निघालेल्या सळ्या चुकवताना जोरदार अपघात होऊ शकतो, त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरु स्ती होणे अवश्यक आहे.- मच्छींद्र मसणे, वाहनचालक.