शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : हरित लवादाने टिमा आणि टीईपीएसच्या वकिलाने सादर केलेले सर्व मुद्दे फेटाळून लावीत तज्ञ समितीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : हरित लवादाने टिमा आणि टीईपीएसच्या वकिलाने सादर केलेले सर्व मुद्दे फेटाळून लावीत तज्ञ समितीने अहवालात स्पष्टपणे तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या एमआयडीसी आणि परिसरात नियमभंग करून प्रदूषण निर्माण करीत असून पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्याचे नुकसान करीत आहेत.हा अहवाल शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून सादर करताना प्रत्यक्षात साईट व्हिजीट, ईटीपी आॅपरेटर व त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यानंतर हा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हा अहवाल नाकारण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नसल्याचे हरित लवादाने स्पष्ट केले आहे. या तज्ञ कमिटी सदस्यांची पात्रता व त्यांच्या अनुभवावर कोणती शंका घेण्याचे कारण नसून त्यांनी सादर केलेला अहवाल स्वीकारण्यात येत असल्याचे आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.ही तज्ञ समिती यापुढेही कार्यरत राहणार असून या समितीत आता जिल्हाधिकारी पालघर यांचाही समावेश करण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. या समितीने एक महिन्यात पर्यावरण गुणवत्ता सुधारणा अहवाल तयार करून लवकर सादर करावा, तज्ञ समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना पर्यावरणाची गुणवत्ता आणि बाधितांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, दोषी कारखानदारांकडून दंडाची रक्कम वसूल करताना टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांवर एमपीसीबीने बंद करण्याची कारवाई करावी, एमपीसीबीने खाडीतील जलसाठे आणि भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेची पाहणी करावी आणि विशेषत: पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासावी, तज्ज्ञ समितीने महिन्यात एकदा भेटावे अथवा आॅनलाईन चर्चा करावी, असे आदेश दिले.हरित लवादाच्या या निर्णयामुळे तज्ज्ञ समितीने १६०.०४२ कोटी रुपये दोषी कारखानदारांकडून वसूल करण्याचा प्रस्ताव सादर केला होता, त्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या रकमेचा वापर तारापूर एमआयडीसी आणि परिसरातील पर्यावरण हानीच्या उपाययोजनेसाठी करण्यात येणार आहे, असे हरित लवादाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेला हे यश प्राप्त झालेले आहे. या निर्णयाविरोधात कारखानदार सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्याची शक्यता पाहता आता आम्ही सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्याची तयारी करीत आहोत.- नरेंद्र नाईक, याचिकाकर्ते,अभामां समाज परिषद