शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Cyclone Nisarga : काळजी करू नका, नुकसान भरपाईचे मी पाहतो, शरद पवार यांचे कोकणवासियांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 15:53 IST

शरद पवार हे माणगांव शहरात आल्यानंतर माणगांवकरातर्फे निसर्ग चक्रीवादळात अतोनात नुकसान झालेल्या नागरिकांच्या व गावकारांच्या समस्या मांडल्या.

- गिरीश गोरेगावकर माणगाव (रायगड) -  माणगांव तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे माणगांव येथे मंगळवार दि. ९ जून रोजी ११.३० वा. महाड अर्बन बँके समोर हजर झाले. त्यावेळी आपत्तग्रस्त नागरिकांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी माणगांवकरांच्या व्यथा मांडल्या. यावेळी खा. सुनील तटकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, आ. भरत गोगावले, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, माणगांव तालुका रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.     शरद पवार हे माणगांव शहरात आल्यानंतर माणगांवकरातर्फे निसर्ग चक्रीवादळात अतोनात नुकसान झालेल्या नागरिकांच्या व गावकारांच्या समस्या मांडल्या. माणगांव शहरात गेले ८ दिवस वीज व पाणी नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विजेचे खांब तुटल्याने वीज पुरवठा गेले ८ दिवस बंद आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद होता. मात्र जनरेटर लावून तो तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेला आहे.अनेकांच्या घराचे पत्रे, कौले उडून अतोनात नुकसान झाले आहे. या वादळात छपर उडाल्याने लोकांच्या घरातील अन्नधान्याची नासाडी झाली आहे. या वादळातील आपतग्रस्तना तातडीने मदत मिळावी व माणगाव तालुक्यातील वीज पुरवठा त्वरित सुरू करावा अशा प्रकारच्या अनेक समस्या व मागण्या माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी मांडल्या. यानंतर शरद पवार यांनी गाडी जवळच  उभे राहूनच या सर्व समस्या व मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण होतील. काळजी नको मी सर्व पाहतो  असे माणगाव करानां आश्वासन दिले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगडSharad Pawarशरद पवार