शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:49 IST

सहजसेवा फाउंडेशन, कारमेल कॉन्व्हेंट स्कूल व खोपोली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक दिवस प्रकृतीसाठी अर्थात निसर्ग आणि स्वत:साठी’ असा संदेश देत भव्य सायकल रॅली काढण्यात आली

खोपोली : सहजसेवा फाउंडेशन, कारमेल कॉन्व्हेंट स्कूल व खोपोली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक दिवस प्रकृतीसाठी अर्थात निसर्ग आणि स्वत:साठी’ असा संदेश देत भव्य सायकल रॅली काढण्यात आली. खास करून विद्यार्थ्यांनी सहभाग घेत या अभियानाची शोभा वाढवली. स्वत:च्या, कुटुंब, परिसराच्या त्या अनुषंगाने देशाच्या आरोग्यासाठी सायकल वापरा, दररोज चालवता येत नसेल तर आठवड्यातून एक दिवस सायकल चालवा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.सहजसेवा फाउंडेशन नेहमीच निरनिराळ्या संकल्पना राबवत असते. आज सायकल चालवून पर्यावरणाची काळजी घेता येते असा सहज सल्ला प्रत्येक नागरिकाला देण्याच्या दृष्टीने विद्यार्थी हे माध्यम वापरले हे देखील महत्त्वाचे आहे, कारण हेच विद्यार्थी उद्याचे नागरिक होणार आहेत आणि त्यांना अशा अभियानातून प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजन जगताप यांनी केले. कारमेल कॉन्व्हेंट शाळेचे क्रीडा प्रशिक्षक जगदीश मरागजे आणि समीर शिंदे यांनी ही रॅली यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.सहजसेवा फाउंडेशनचे शेखर जांभळे, गुरुनाथ साठेलकर, नकुल देशमुख, संतोष गायकर, अमित खिसमतराव, प्रल्हाद अत्रे आदींनी सहभाग घेतला. तसेच खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस राजवर्धन खेबुड, सुतार, किरण शेळके, भडाळे, बिट मार्शल हे देखील रॅलीत सहभागी झाले होते. जोरदार घोषणा देत सायकल रॅली निघाली.