शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा अभयारण्य परिसरातील ध्वनिप्रदूषणाला आळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 00:31 IST

रुंदीकरणात कर्नाळा अभयारण्यातील वन्यजीवांना धोका निर्माण होणार असल्याने याकरिता उपाययोजना राबविण्यासाठी राज्य व राष्ट्रीय वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २०१५ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत पार पडली होती.

वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात कर्नाळा अभयारण्याचा भाग बाधित झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात हा भाग येत असून या ठिकाणी रुंदीकरणाचे काम पूर्णत्वाला आल्याने वाहनांची वर्दळ लक्षात घेता होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे नॉईस बॅरिअर्स (ध्वनिरोधक) यंत्रणा बसविण्यास सुरुवात केली आहे.रुंदीकरणात कर्नाळा अभयारण्यातील वन्यजीवांना धोका निर्माण होणार असल्याने याकरिता उपाययोजना राबविण्यासाठी राज्य व राष्ट्रीय वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २०१५ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत पार पडली होती. या बैठकीत कर्नाळा अभयारण्यातील महामार्गाचे रुंदीकरण झाल्यावर वाहनांचा वेग वाढणार असल्याचे लक्षात घेता विविध उपाययोजना राबविण्याच्या अटी व शर्ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला घालण्यात आल्या होत्या. यामधील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्याची महत्त्वाची अट घातली होती. यानुसार ध्वनिरोधक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अभयारण्याच्या दीड किलोमीटर परिसरात हे बॅरिअर्स बसविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी हेमंत फेगडे यांनी दिली.तसेच, अभयारण्यात पर्यटकांची मोठी वर्दळ असते. याकरिता या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे. याव्यतिरिक्त वाहनांची गती कमी करण्यासाठी रम्बलर्स, माकडांकरिता मंकी लँडर उभारण्याच्या सूचना अभयारण्य प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केल्या आहेत.

ध्वनिरोधक यंत्रणेमुळे अभयारण्यातील वन्यजीवांना होणारा ध्वनिप्रदूषणाचा त्रास कमी होणार आहे. या बॅरिअर्सची उंची दीड मीटर असून ती दोन मीटरपर्यंत करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करणार आहोत.- पी. पी. चव्हाण, कर्नाळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य