शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची कर्जतच्या भात खरेदी केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:22 IST

पावसाच्या भीतीने चिंता

विजय मांडेलोकमत न्यूज नेटवर्क कर्जत : तालुक्यात शेतकरी सहकारी खरेदी-विक्री केंद्र कशेळे येथील आदिवासी क्षेत्रातील भात खरेदी केंद्र आणि नेरळ अशी तीन हमीभाव भात खरेदी केंद्र आहेत. यंदा कशेळे आणि नेरळ हमीभाव भात खरेदी केंद्र बंद असल्याने, तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी कर्जत भात खरेदी केंद्रावर गर्दी केल्याने या केंद्रावरील कामाचा ताण वाढला आहे. मोठ्या प्रमाणात भात खरेदी करून ठेवण्यास गोदामे अपुरी पडत असल्याने भात खरेदीला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल भात खरेदी न होता, तसाच उघड्यावर पडून आहे. त्यातच पावसाची शक्यता असल्याने भात भिजते की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

भात खरेदी केंद्रावर भात आणून ठेवले आहे, पण खरेदीसाठी आपला नंबर लागतो की नाही? या विवंचनेत शेतकरी असून अचानक पाऊस आल्यास भाताचे नुकसान होण्याची भीतीही शेतकऱ्यांना सतावत आहे. यापूर्वी भात खरेदी केंद्राला शासनाकडून अतिरिक्त गोदामांची सोय केली जात होती. गोदामांच्या भाड्याचा भार शासन उचलत असे. मात्र, बदलत्या शासन निर्णयानुसार आता गोदाम हवे असल्यास, भात खरेदी केंद्रालाच स्वतः सोय करावी लागेल. शासन गोदामाचे भाडे देणार नसल्याने आर्थिकदृष्ट्या भात खरेदी केंद्राला हे परवडणारे नसल्याने नेरळ भात खरेदी केंद्र बंद आहे. यापूर्वी नेरळ केंद्राला शासनाने उपलब्ध करून दिलेले गोदाम परत घेतले आहे. कशेळे केंद्रात खरेदी केलेले भात ठेवण्यासाठी लागणाऱ्या बारदानाची कमतरता आहे. या कारणाने दोन्ही केंद्र बंद असल्याचे कर्जत भात खरेदी केंद्रांचे व्यवस्थापक केतन खडे यांनी सांगितले. थोडक्यात, शासनाच्या या बदलत्या निर्णयाचा फटका भात खरेदी केंद्रांना बसला आहे. कोरोनाच्या काळात शासनाने मोठ्या प्रमाणात धान्याचे वाटप केले. यामुळे बहुतांश शेतकरी आपल्याकडील सर्वच भात घरी न ठेवता हमीभाव मिळावा, यासाठी खरेदी केंद्रावर आणत आहेत. 

तालुक्यातील अन्य दोन्ही भात खरेदी केंद्र बंद असल्याने, कर्जतच्या केंद्रावर गर्दी वाढली आहे, तसेच शासनाच्या बदलत्या निर्णयामुळे गोदाम मिळण्यास अडचण येत आहे. - केतन खडे, व्यवस्थापक, खरेदी विक्री केंद्र

कर्जत भात खरेदी केंद्रावर कामगारांची कमतरता असल्याने, दिवसाला जेमतेम चारशे ते साडेचारशे पोत्याचा काटा होतो. अतिरिक्त गोदामांची सोय उपलब्ध करून सर्व शेतकऱ्यांचा भात खरेदी करावा.                                    -दशरथ मुने, शेतकरी