शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा अभयारण्यात पक्षिप्रेमींसह पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:25 IST

पक्षी निरीक्षणाचा हंगाम सुरू : १३४ प्रजातींचे पक्षी; अरण्यात ६४२ प्रकारचे वृक्ष

- नामदेव मोरे

नवी मुंबई : कर्नाळा अभयारण्यात पक्षी निरीक्षण हंगाम सुरू झाल्यामुळे पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ४.४८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या अभयारण्यात ६४२ प्रजातींचे वृक्ष आहेत, तर तब्बल १३४ प्रजातींचे स्थानिक व ३८ स्थलांतरित पक्षी पाहावयास मिळत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. शासनाने कर्नाळा किल्ल्याच्या परिसरातील ४.४८ चौरस किलोमीटर क्षेत्र १९६८ मध्ये पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. ५० वर्षांमध्ये येथील वनसंपदा व पक्ष्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. आॅक्टोबर ते फेब्रुवारी हा पक्षी निरीक्षणासाठी योग्य कालावधी समजला जातो, यामुळे पर्यटकांची व पक्षिप्रेमींची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी ठाणे वन्यजीव विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. अभयारण्याच्या सुरुवातीलाच पक्ष्यांची माहिती कोणत्या परिसरात कोणते पक्षी सापडतील, याची माहिती देणारे फलक लावले आहेत.

निरीक्षणासाठी रेस्ट हाउस समोर, गोल प्लॅटफॉर्म, हरियाली ट्रेल, मोरटाका ट्रेल, हरियाली ट्रेल मध्यभाग, बर्ड वाचर्स पॉइंट, कर्नाळा किल्ला अशी सात ठिकाणे निवडली आहेत. पक्षिप्रेमींना वनविभागाचे अधिकारी व संयुक्त वनसमितीमध्ये काम करणारे, स्थानिक, गावांमधील कर्मचारी अभयारण्याची व पक्ष्यांचीही माहिती देत आहेत. राज्यातील प्रमुख पक्षी अभयारण्य म्हणून कर्नाळाची ओळख निर्माण झाली असून, ती टिकविण्यासाठी वनविभागाने विविध सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला प्रसाधनगृह, गेस्टहाउस, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, बचतगटाच्या माध्यमातून जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.पर्यटनासाठी योग्य वेळकर्नाळा अभयारण्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी आॅक्टोबर ते फेब्रुवारी ही योग्य वेळ आहे. सद्यस्थितीमध्ये वातावरण चांगले आहे. संपूर्ण परिसरात हिरवळ पसरली असून, पक्षी निरीक्षणासाठी व पर्यटनासाठीही हीच योग्य वेळ असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

प्राण्यांची संख्याही वाढली : अभयारण्यात प्राण्यांची संख्याही वाढू लागली आहे. रानमांजर, ससा, भेकर, रानडुक्कर, साळिंदर, खार, वानर, माकड व इतर प्राणीही अभयारण्यात मोठ्या प्रमाणात आहेत.

 

अभयारण्यास भेट देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. पर्यटकांच्या व पक्षी निरीक्षकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पर्यटक कुटी, बटरफ्लाय गार्डन, निरीक्षणासाठी रानवाटा तयार केल्या आहेत.-प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी

 

अभयारण्यात महामार्गाकडून पूर्वेकडे हरियल व मोरटाक या दोन महत्त्वाच्या निसर्गवाटा आहेत. अनुभवी पक्षी निरीक्षकांना या वाटांवर एका भेटीत ४७ पेक्षा जास्त पक्षी पाहता येतात. महामार्गाच्या पश्चिमेला गारमाळ ही अजून एक निसर्गवाट अस्तित्वात आहे.

  • अभयारण्यात सापडणारे पक्षी : शिपाई बुलबुल, लालबुड्या बुलबुल, टकाचोर, राखी कपाळाची हारोळी, नारंगी डोक्याचा कस्तूर, टिकेलचा निळा माशीमार, बाकचोच सातभाई, निलगिरी रानपारवा, पाचू होला, निलांग माशीमार, लाल छातीचा माशीमार, राखी डोक्याची पिवळी माशीमार, कोकीळ, रान धोबी, पांढºया गालाचा कुटुरगा, कोतवाल, जाड चोचीचा फुलटोच्या, टोई पोपट, राखी कोतवाल, वेडा राघू, चष्मेवाला, करडा धोबी, भांगपाडी मैना, दयाळ, टिटवी, हुदहुद, ठिपकेवाला पिंगळा, पांढºया भुवईचा धोबी, पट्टेदार कोकीळ, शिक्रा, मलबार शिळ कस्तूर, जांभळा शिंजीर, तांबट छोटा सोनपाठी सुतार, तिबोटी धिवर, सामान्य धिवर, शिंपी, शामा, सामान्य खरुची, तुरेवाला सर्पगरुड, पिंगट पोटाचा सातभाई, जंगली मैना, पांढºया छातीचा धिवर, पिवळी रामगंगा, नील कस्तूर, भारतीय नील दयाळ, राखी वटवट्या, चिमण चंडोल, काळटोप कस्तूर, सुभग, डोमकावळा, भारतीय राखी धनेश, तांबूस सुतार, ठिपकेवाला सातभाई, पांढऱ्या ठिपक्यांची नाचण.
टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यRaigadरायगडtourismपर्यटन