शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणेश पंचायतन मंदिरात गर्दी

By admin | Updated: February 1, 2017 00:34 IST

समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन आणि राज्यातील एकमेव अशा गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाचे

अलिबाग : समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन आणि राज्यातील एकमेव अशा गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाचे मंगळवारी प्रतिवर्षीप्रमाणे कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजन केले होते. नवसाला पावणारे आणि मनोकामना पूर्ण करणारे हे गणेश पंचायतन असल्याची मोठी श्रद्धा भाविकांमध्ये असल्याने राज्यभरातून भाविक दर्शनाकरिता आले होते. नवस फेडण्याकरिता भाविकांनी सोमवारी रात्रीच किल्ल्यात मुक्कामास येवून पहाटे पाच वाजता महापूजा झाल्यावर गणेश पंचायतनचे दर्शन घेवून आपले नवस फेडले. कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अलिबाग शहरातील दानशूरांच्या सहयोगातून येथे दरवर्षी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद (भोजन) देण्याचा उपक्रम करते. कोळी समाज आणि शहरातील सुमारे २५० भाविक हा महाप्रसाद गणेश सेवा या भावनेतून तयार करीत असतात. यंदा ५० हजारपेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती मंडळाचे सदस्य बाळाराम भगत यांनी दिली.अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आंग्रेकालीन ‘गणेश पंचायतन’ मंदिर अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यात आहे. किल्ल्यातील पोखरणीच्या (तलावाच्या) पश्चिमेस हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी दगडी चौथऱ्यावर उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक गणपती, पुढील बाजूस डावीकडे ‘सांब’ तर उजवीकडे ‘विष्णू’ आणि मागील बाजूस डावीकडे ‘सूर्य’ तर उजवीकडे ‘देवी’ अशा एकूण पाच मूर्तींच्या या समूहास गणेश पंचायतन असे संबोधले जाते. संपूर्ण काळ्या दगडातील हे मंदिर थोरल्या राघोजी आंग्रे यांनी बांधले. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कार्तिकस्वामी व उजव्या बाजूस गणपतीची प्रतिमा आहे. मंदिराचे सभागृहसुद्धा अष्टकोनी असून येथे आल्यावर भाविकांना एक आगळी शांती प्राप्त होत असल्याचे दर्शनास आलेल्या काही भाविकांनीच सांगितले. अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी बंदोबस्त उपलब्ध करुन दिला होता. (विशेष प्रतिनिधी)वरदविनायकाच्या जन्मोत्सवासाठी भाविकांची गर्दीवावोशी : महड येथील गणपती मंदिरात श्री वरदविनायकाचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी श्री गणपती संस्थान महडचे विश्वस्त सिद्धार्थ विनायक जोशी यांच्या हस्ते श्रींची महापूजा करण्यात आली, तर पुणे येथील कपणाने यांचे सुश्राव्य असे कीर्तन पार पडले. गणेश जन्मानंतर नवसाचा नारळ घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळत होते. मंदिरामध्ये काढलेली आकर्षक रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. वरद विनायक फूल रांगोळी मंडळ यांनी रांगोळी साकारली होती. रांगोळी काढण्यासाठी १५० किलो फुलांचा वापर करण्यात आला. ही रांगोळी काढण्यासाठी वीस तास लागले. दर्शनरांग दोन किमीपेक्षा लांब गेली होती.