शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

तरुणावर मगरीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 22:58 IST

गंभीर जखमी : सावित्री नदीपात्रालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण

म्हसळा : तालुक्यातील पांगळोली येथील मच्छीमार फैजान मयनुद्दीन धनसे (१९) हा तरुण सावित्री नदीच्या पात्रात मच्छीमारी करीत असता मगरीच्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाला. याबाबतची माहिती म्हसळा वनविभागाचे कोंझरी परिमंडळचे वनाधिकारी बाळकृष्ण गोरनाक यांनी दिली. या घटनेमुळे सावित्री नदीच्या पात्रालगतच्या गावांमध्ये तसेच मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेची माहिती फैजानचे वडील मयनुद्दीन यांनी म्हसळा वनविभागाला दिली होती. त्यानुसार बाळकृ ष्णगोरनाक यांच्या समवेत वनरक्षक अतुल आहिरे, दिलीप वाधे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सावित्री नदीपात्रात कोंझरी, कोळे, तोराडी, पांगळोली, निगडी (ता. मंडणगड-रत्नागिरी) या परिसरांतील मच्छीमार मोठ्या प्रमाणात जीव धोक्यात टाकून मच्छीमारी करीत असतात.शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी सायं.५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान पांगळोली येथील मच्छीमार फैजान व त्याचा मित्र मुझफ्फर अ. र. धनसे हे दोघे कोंझरी गावानजीक काळवी, गडदाब या सावित्री नदीला मिळणाऱ्या खाडीत मच्छीमारी करत असताना मगरीने फैजानवर प्राणघातक हल्ला करून त्याचा डाव्या पायाचा गुडघा निकामी केल्याची घटना घडली. मिरज येथील रु ग्णालयात फै जानवर उपचार सुरू आहेत.या भागातील खाडींचा भाग निमखाºया पाण्याचा आसल्याने या खाडीत मगरींना वास्तव्यासाठी पोषक वातावरण आहे, गेल्या काही वर्षांत या परिसरात मगरींची संख्या वाढली आहे. मगर मांसाहारी असून मासे हे तिचे मुख्य अन्न आहे. पक्षी व जमिनीवरील प्राणी हेही ती खाते. पाणी प्यायला आलेली गुरे लहान वासरे यांवर झडप घालून मगर शिकार करते. यासाठी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. वनविभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या परिसरात जनजागृतीचे बोर्ड लावणार आहोत.- नीलेश पाटील, परिक्षेत्र वनाधिकारी, म्हसळा