शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कागदापासून आकर्षक गणेशमूर्तीची निर्मिती; संतोष थळे यांची कला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:17 IST

कोरोनामुळे मुंबई, पुणे येथून आलेल्या ऑर्डर रद्द झाल्याने चिंता

अलिबाग : गणेशोत्सव अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. शासनाने पर्यावरणपूरक मूर्तींची स्थापना करण्याच्या भाविकांना सूचना केल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील सागाव गावातील पेशाने शिक्षक असलेले संतोष थळे हे गेल्या १७ वर्षांपासून कागदाच्या आकर्षक गणेशमूर्ती बनवत आहेत. मात्र, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे मुंबई-पुणे येथून आलेली मागणी रद्द झाली आहेत. त्यामुळे त्यांना लाखो रु पयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.गणेशमूर्तीपूर्वी गणेशाच्या मूर्ती शाडू मातीपासून बनविल्या जात. त्यानंतर, प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्तींना मागणी वाढू लागली. मात्र, केंद्र शासनाने प्लास्टर आॅफ पॅरिसवर बंदी आणल्याने, पुन्हा शाडूमाती आणि इतर पर्यावरणपूरक वस्तूंपासून गणेशमूर्ती बनविण्यास प्राधान्य मिळत आहे. सागाव येथील संतोष थळे यांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्याचा छंद आहे. २००३ पासून त्यांनी कागदापासून शोपीस, पपेट बनविण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्यांना गणेशमूर्ती तयार करण्याची संकल्पना सुचली. गणपतीच्या साच्यामध्ये कागदाला खळ लावून कागद बसवून गणपतीच्या आकर्षक मूर्ती तयार केल्या जातात. त्यानंतर, या मूर्तींना पर्यावरणपूरक जलरंग देऊन रंगरंगोटी केली जाते. कागदापासून बनविलेल्या सुबक आणि आकर्षक मूर्तींची थळे विक्र ी करतात.या वर्षी मुंबई-पुणे येथूनही शेकडो मूर्तींची आॅर्डर थळे यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी गणपतीच्या मूर्तीही बनवल्या. मात्र, कोरोना संकट असल्यामुळे थळे यांना मिळालेल्या आॅर्डर रद्द झाल्या आहेत. त्यामुळे बनविलेल्या गणेशमूर्ती विकायच्या कशा? हा एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाआहे.भाविकांना पर्यायरायगड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये कोरोनामुळे अद्याप गणेशमूर्ती पोहोचलेल्या नाहीत. या वर्षी कोरोनामुळे कमी पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. संतोष थळे यांनी कागदापासून बनविलेल्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असून, भाविकांकडे या मूर्तींची स्थापना करण्याचा एक पर्याय उपलब्ध आहे. गणेशमूर्तीची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली मात्र आॅर्डर रद्द झाल्यामुळे संतोष थळे यांनी ‘लोकमत’जवळ चिंता व्यक्त के ली.