शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आपटवणे ११२ पटाची जिल्हा परिषद शाळा भरते मंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:59 IST

सुधागड तालुक्यातील आपटवणे गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळून दोन वर्षे झाली तरी आजतागायत दुरुस्ती किंवा नूतनीकरण झाले नाही,

- विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील आपटवणे गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळून दोन वर्षे झाली तरी आजतागायत दुरुस्ती किंवा नूतनीकरण झाले नाही, त्यामुळे १०२ पटाची आपटवणे शाळा गावातील काळभैरव मंदिराच्या सभागृहात भरवली जात आहे. ही शाळा इयत्ता सातवीपर्यंत असल्याने भावशेत, भावशेत ठाकूरवाडी, आदिवासीवाडी, वारगवने, नंदुरकी, गडदवणे गावातील मुले व मुली शिक्षण घेण्याकरिता येतात. मात्र, दोन वर्षे झाली तरी इमारत न झाल्याने पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षक, विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त के ली आहे.शासन शिक्षण विभागावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाल्याचे सांगत असले, तरी ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुधागडात अनेक इमारती ना दुरुस्तीच्या अवस्थेत असलेले चित्र बघावयास मिळतआहे. शिक्षण खात्याच्या बेजबाबदारीचा नाहक त्रास पालकव विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.आपटवणे शाळेची इमारत कोसळून दोन वर्षे होऊन गेली तरी या शाळेच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अधिकारी आलेच नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ व पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.शालेय इमारतीच्या नूतनीकरणासाठी पाच प्रस्ताव शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदकडे पाठवूनही आजवर त्याची दखल घेतली नाही. या शाळेत आदिवासी व ठाकूर समाजाची मुले शिकत असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.सध्या शाळा कालभैरव मंदिराच्या सभागृहात भरत आहे. पावसाळा असल्यामुळे मुलांची बसण्याची गरसोय होत आहे, याची तत्काळ संबंधित खात्याने दखल न घेतल्यास शाळा व्यवस्थापन समिती आपटवणे व आपटवणे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ-पालक मिळून आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आला आहे.